अपंगत्वावर मात करीत जपला व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 00:21 IST2021-01-15T00:21:32+5:302021-01-15T00:21:52+5:30
तांबे, पितळीची भांडी बनविण्याची कला

अपंगत्वावर मात करीत जपला व्यवसाय
श्रीकांत नांदगावकर
तळा : वयाच्या सहाव्या वर्षांपासून आलेल्या अपंगत्वावर मात करीत गणेश(बाबा) रामचंद्र वडके निरक्षर न राहता प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत पूर्ण केले. नोकरी करणे शक्य नसल्याने त्यांनी वडिलोपार्जित तांबे, पितळीची भांडी बनविणे, भांड्याला कलई, पत्रा, डबे, दिवे बनविण्याची कला अंगीकारून वडिलांना मदत करू लागले. कालांतराने वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पश्चात गणेश वडके यांनी भांड्यांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला; मात्र आधुनिक काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडत गेला. वाढती महागाई तांबा-पितळ धातूचे वाढते दर, मजुरी यामुळे अनेक प्रकारचे भांडी बनविण्याचे कारखाने बंद पडले. मात्र, गणेश वडके यांनी जिद्दीने आत्मविश्वासाने अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता तेवढ्याच हिमतीने बंद पडलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यास सुरुवात केली आहे.
महाड, रोहा-अष्टमी, नागोठणे, पेण या मोठ्या शहरांमध्येदेखील भांड्यांचा व्यवसाय बंद पडल्याने येथील व्यापाऱ्यांनी इतर व्यवसाय पत्करला आहे. तर काहींंनी नोकरी पत्करली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे भांड्याला कल्हई लावणे दुरापास्त झाले आहे. मात्र, आता याच व्यवसायाला आयुर्वेदात तांबा पितळ आरोग्यासाठी किती महत्त्व आहे हे पुन्हा समजू लागल्याने काहीजण घरात तांबा, पितळेची भांडी वापरू लागलो आहेत, तर लग्नकार्यात मुलीला आंदणात देण्यासाठी परात, तांब्या भांडे, समई, हंडा, कळशी, आदी वस्तू दिल्याशिवाय रुखवत पूर्ण होत नाही. हे समजून गणेश वडके यांनी जिद्दीने बंद पडलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यास सुरुवात केली आहे.
n साधी राहणी गावखेड्यातील, शहरातील ओळख असल्याने आताच्या परिस्थितीत व्यवसाय सुरू केला असून, त्यांचा उदरनिर्वाह आज त्याच व्यवसायावर सुरू आहे. रोज कासार आळीत हातोडा वाजायला लागल्याने कासारआळी असल्याचे जाणवू लागले आहे. त्यामुळे गणेश ऊर्फ बाबा यांच्याकडे कौतुकाने पाहिले जात आहे.