शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

जिल्ह्यात जय भवानी... जय शिवाजीचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:09 IST

रायगड जिल्ह्यामध्ये तिथीनुसार शनिवारी सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये तिथीनुसार शनिवारी सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयभवानी... जय शिवाजी...!चा जयघोष करीत रस्त्यारस्त्यांवर निघालेल्या रॅली, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे, चौकाचौकांमध्ये उभारलेले भगवे झेंडे, कानावर पडणारी डफाची थाप यामुळे जिल्ह्यात शिवशाही उतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. किल्ले रायगडावर शनिवारी सकाळपासून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी सायंकाळी लक्षवेधी मिरवणुका निघाल्या होत्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला, त्या रायगड जिल्ह्यात शनिवारी शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी झाली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यात सकाळपासून शिवप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. समुद्राला भरती असतानाही या शिवप्रेमींनी ओहटीची वाट न पाहता बोटीच्या साहाय्याने शिवघोषणा देत किल्ल्यात प्रवेश केला. त्याचप्रमाणे रायगडमधील अन्य ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर शिवप्रेमींचा दिवसभर गजबजाट होता. शिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी तमाम शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात शिवध्वज, भगवे जॅकेट, कुर्ता भगवे फेटे बांधून युवक आणि युवती मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामध्ये आबालवृद्ध पुरुषांप्रमाणे महिलाही मागे नव्हत्या. नऊवारी, नाकात नथ, डोक्यावर भगवा फेटा, अशा पारंपरिक पेहरावात आलेल्या महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधले.महाडमध्ये शिवज्योतींचे स्वागतमहाड : महाडमध्ये तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली. यानिमित्ताने रायगड किल्ल्यावरून तालुक्यातील विविध मंडळांकडून तसेच राज्यभरातून आलेल्या शिवज्योतींचे शहरात स्वागत करण्यात आले.सायंकाळी उशिरा शहरातील विविध मंडळांनी शिवदेखाव्यासह वाजत गाजत मिरवणूक काढली. या वेळी संपूर्ण शहरात शिवघोष करण्यात आला. शहरात भगवे झेंडे सर्वत्र फडकत होते. मिरवणुकीत सरेकरआळी मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ काजळपुरा, महाराणा प्रताप मंडळ कुंभारआळी, तांबड भुवन, काकरतळे मित्रमंडळ, गवळआळी आदी विभागातील मंडळाचे आखाडे सहभागी झाले होते.शिवजयंती उत्साहातकर्जत : नेरळ येथील मोहाची वाडीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. लहान मुलांसाठी सायकल स्पर्धा, धावणे, असे विविध खेळ घेण्यात आले.स्पर्धांचे आयोजनकर्जत : तांबस येथील शिवशाहीर ग्रुपच्या वतीने गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवकांनी प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या.रक्तदान शिबिरमोहोपाडा : माजगाव प्रेरणा मित्रमंडळ यांच्या वतीने शनिवारी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवस्मारकाचे पूजन झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नेरळमध्ये दुचाकी रॅलीनेरळ : शिवजयंतीनिमित्त वाहनावर भगवे झेंडे लावून शिवजयघोष करीत फिरणाऱ्या युवकांमुळे नेरळ व परिसर दुमदुमून गेला होता. श्री चेडोबा मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. या वेळी दुचाकी रॅलीचे आयोजन तर सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.श्रीवर्धनमध्ये चोख बंदोबस्तश्रीवर्धन : श्रीवर्धन शहर हे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानले जाते. शिवजयंती ,ईद, होळी ,रमजान ,मोहरम या सारख्या सणांना श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस तुकड्यांची कुमक मागवली जाते. श्रीवर्धन शहरातील सर्व ठिकाणांचा आढावा घेण्यासाठी पोलीस दलाने श्रीवर्धन शहरात पोलीस संचलन केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज