शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

संत्र्यानंतर आता नाशपाती, हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली तस्करी, मुंबई डीआयआय विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 18:43 IST

हिरव्या सफरचंदाच्या नावाखाली तस्करी करण्यात आली असून मुंबई डीआयआय विभागाने कारवाई केली आहे. 

मधुकर ठाकूर 

उरण (रायगड) : याआधी संत्र्याच्या आडून १४७६ कोटी अमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशपाती, हिरवी सफरचंदाच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्यात आलेल्या एका कंटेनरमध्ये ५०० कोटीहुन अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जेएनपीए बंदरात मुंबई डीआयआय विभागाने कारवाई केली अशी माहिती डीआरआय सुत्रांनी दिली. 

याआधी या महिन्याच्या सुरुवातीलाच एजन्सीने संत्र्यांच्या एका खेपेतून १९८ किलो मेथ आणि ९ किलो कोकेन असा १४७६ कोटी किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी व गुप्त खबऱ्याकडून मुंबईच्या डीआयआय विभागाच्या अधिकाऱ्यांना पक्की खबर मिळाली होती.या माहितीच्या आधारे डीआयआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (६) जेएनपीए बंदरातून दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेल्या नाशपाती आणि हिरवी सफरचंद घेऊन जाणारा कंटेनर अडवला. कंटेनरमधील मालाची तपासणी केली असता हिरव्या सफरचंदांच्या बॉक्समध्ये उच्च गुणवत्तेच्या कोकेनच्या प्रत्येकी अंदाजे एक किलो वजनाच्या मोठ्या प्रमाणात विटा लपविल्याचे निदर्शनास आले.अधिक तपासणी केल्यानंतर कोकेनच्या  ५०.२३ किलो वजनाच्या ५० विटा जप्त करण्यात आल्या आहेत. या अमली पदार्थांच्या साठ्याची किंमत ५०२ कोटी असल्याची माहिती एका डीआयआय अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी