बोर्लीपंचतन येथे भरपावसात पाणीटंचार्ई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:54 AM2019-08-01T01:54:38+5:302019-08-01T01:54:51+5:30

नागरिक संतप्त : कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

Irrigation water supply at Borli Panchatan | बोर्लीपंचतन येथे भरपावसात पाणीटंचार्ई

बोर्लीपंचतन येथे भरपावसात पाणीटंचार्ई

Next

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले बोर्लीपंचतन गावच्या पाणीपुरवठ्याबाबत सातत्याने समस्या निर्माण होत आहेत. सध्या होत असलेल्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

बोर्लीपंचतन गावाला जून ते डिसेंबर या महिन्यामध्ये कोंढेपंचतन या धरणातून पाणीपुरवठा केला जातो व कार्ले येथील धरणातून जानेवारी ते मे या महिन्यात पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या लाइनबाबत अशा अघटित घटना समोर येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होत आहे. ज्या दिवशी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला त्याच दिवशी मध्यरात्री कार्ले धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव असणारा साठा कुणा समाजकंटकांनी नदीला सोडून दिला. कार्ले धरणातील पाणी साठ्यावर बोर्ली पंचतन, दिवेआगर, भरडखोल या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. त्यामुळे भरउन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होऊ लागला, त्याचा नाहक
त्रास हा नागरिकांना सहन करावा लागला.
पावसाळा सुरू झाल्यापासून कधी मुख्य पाइपलाइन फुटणे, तर कधी मुख्य वॉलमध्ये चप्पल, पत्र्याच्या टाकाऊ वस्तू सापडून पाणीपुरवठा बंद होणे असे प्रकार गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत होऊ लागले आहेत. त्यातच आता कोंढेपंचतन धरणातून बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणाºया मुख्य पाइपमध्ये मोठा दगड आढळून आला, त्यामुळे काही दिवस पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचे घटत असणारे प्रमाण त्याचा धरणाच्या पाणीसाठ्यावर होणारा परिणाम त्यातच अशा घडणाºया घटना घडत राहिल्या तर येणाºया काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेल.
कार्ले धरणातून मध्यरात्री सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. नागरिकांच्या दृष्टीने जीवनावश्यक असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा भविष्यामध्ये गंभीर रूप धारण करू शकतो. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून ग्रामपंचायतीकडे के ली जात आहे.
सध्या कोंढे धरणातून येणाºया पाइपलाइनला गळती लागल्याने बोर्लीकरांसाठी पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी गाव पातळीवरती ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्याकडून अथक प्रयत्न
चालू आहेत. मात्र, बोर्लीपंचतन गावावरील पाणीसंकट सुटताना दिसत नाही.

कोंढेपंचतन ते बोर्लीपंचतन मार्गावरील आठ इंच पाइपलाइनमध्ये सहा इंच दगड मिळाला. नंतर गणेश चौक येथील पाइपलाइनमध्ये चप्पल व टाकाऊ वस्तू मिळाल्या. अशा घटना घडत असताना ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्यांच्या सहकार्याने पुढे लवकरच मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी पाइपलाइनची दुरुस्ती सुरू आहे.
- नम्रता गाणेकर,
सरपंच, बोर्लीपंचतन

निर्माण होणाºया प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज आहे तरी ग्रामस्थांनीसुद्धा सहकार्य करावे, ही विनंती.
- मन्सुर गिरे,
उपसरपंच, बोर्लीपंचतन

भरपावसात पाण्याचा एवढा अडथळा असेल तर मग एप्रिल, मे महिन्यांत काय अवस्था असेल, ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून मुबलक पाणीपुरवठा करावा.
- अमोल चांदोरकर, ग्रामस्थ.
 

Web Title: Irrigation water supply at Borli Panchatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.