शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, रवींद्र चव्हाण यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 21:44 IST

महाड शहरानजीक पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

रायगड - जिल्हा एकीकडे कोरोनाच्या संकटातून मार्ग काढीत असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडला. या वेदनांमधून सावरत नाही तोच महाड शहरानजीक पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.महाड शहरानजीकच्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली .या घटनेनंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून घटनेबाबतची माहिती घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तातडीने मदत करण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.महाड शहरानजीक असणाऱ्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील कोसळलेल्या इमारतींबाबत माहिती घेताना या इमारतीला परवानगी देण्यात आली होती का ? अधिकृत आणि नियमांच्या अधीन राहून या इमारतीचे बांधकाम केले होते का ? महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी . इमारत दुर्घटनेबाबत रायगड  जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि या इमारत दुर्घटनेमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे

टॅग्स :RaigadरायगडAccidentअपघात