भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:56 PM2020-06-26T23:56:59+5:302020-06-26T23:57:18+5:30

आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Insurance company that avoids compensation will be brought to book - Sunil Tatkare | भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच विमाधारक शेतकºयांकडून पैशाची मागणीही करत असल्याने संबंधित अधिकाºयांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशारा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता ४०० कोटींची मदत दिली आहे. नारळ, सुपारी आणि कोकम या पिकांना नुकसानीच्या व्याख्येते आधी घेतले नव्हते. मात्र, त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर, त्याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय काढला. त्यामुळे आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
मासेमारी व्यावसायिकांना नोव्हेंबर, २०१९ पासून विविध आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांच्यासाठी लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या मदतीसाठीही सरकार मदतीचा हात पुढे करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
>बैठकीत जाब विचारणार
रायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या फळ झाडांचा विमा काढला होता. ओरिएंटल विमा कंपनी आता बागायतदारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
काही ठिकाणी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून परताव्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. शेतकºयांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेणाºया ओरिएंटल विमा कंपनीस वठणीवर आणण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय योजना करण्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
>वन संपदेचे पंचनामे करणार
निसर्ग चक्रीवादळामुळे वन्य संपदेचेही आतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत वन विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यांनीही तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निसर्ग वादळामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत पुढील आठ दिवसांमध्ये मदत येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Insurance company that avoids compensation will be brought to book - Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.