शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये नुकसानीपेक्षा भरपाई रक्कम अपुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 02:10 IST

महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात आले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. याची रक्कम महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४५ लाख दहा हजार रुपये आली असून, ४९ गावांमधील २००० शेतकºयांना याचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.प्रत्यक्षात १ कोटी ५८ लाख रुपये भरपाई रक्कम येथे अपेक्षीत होते मात्र, नुकसानीपेक्षा भरपाई कमी असल्याने शेतकरी वर्ग या नाराज आहे. शासनाने शेतकºयांवर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कमी रक्कम जमा झाल्याने किती शेतकºयांना हा मोबदला देण्यात येणार आहे आणि शिल्लक शेतकºयांचा पैसा कधी येईल याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यांमध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रतिहेक्टर आठ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये दोन हजार २३ शेतकरी बाधित झाले.या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून ४५ लाख दहा हजार ८६९ नुकसानभरपाई दाखल झाली असल्याची माहिती महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. तालुक्यामध्ये सुमारे सात हजार शेतकºयांचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती महाड तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यात येत असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.महाडमधील २०३ शेतक-यांचा पीक विमामहाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या तर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दोन हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे जरी करण्यात आले असले, तरी सुमारे सात हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगरउतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहे.|तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून उतरविण्यात आला असून, विमा कंपनीकडूनहीत्यांना भरपाई मिळेल. मात्र, विमा प्रकरण मंजूर होईपर्यंत शासकीय मदत शेतकºयांना मिळणार आहे.पुढील टप्प्यातील वाटप कधी; प्रशासन अनभिज्ञसध्या आलेली रक्कम ही अपुरी आहे आणि नुकसानग्रस्त शेतकरी संख्या अधिक आहे.आलेली रक्कम कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.ही अपुरी रक्कम वाटपानंतर पुढील टप्पा कधी येणार याबाबत मात्र महसूल विभागाकडून काही सांगण्यात आले नाही.

टॅग्स :agricultureशेतीRaigadरायगडFarmerशेतकरी