शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव-दिघीमध्ये औद्योगिक प्रकल्प, ३ लाख रोजगार निर्मिती होणार; सुनील तटकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:03 IST

Sunil Tatkare News: केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्फे रायगड जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्प माणगाव-दिघी परिसरात उभारला जाणार आहे.

 अलिबाग - केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्फे रायगड जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्प माणगाव-दिघी परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी ४ हजार एकरवर १ हजार ८६५ कोटी रुपये खर्च करून पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. १ हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्क, ६१ हेक्टरवर चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पासाठी जागा नियोजित केली आहे. या कामांना फेब्रुवारीत सुरुवात होणार असल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी मंगळवारी अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत दिली. दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पामुळे ३ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माणगाव, तळा आणि परिसरात दिघी औद्योगिक वसाहतीची उभारणी होणार आहे. फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे, असे ते म्हणाले. 

चर्मोद्योग प्रकल्पासाठी १०० कोटींचे अनुदानदिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पात प्रामुख्याने तीन प्रकारच्या उद्योगांचा समावेश असणार आहे. यात वाहन उद्योग प्रकल्प, चर्मोद्योग समूह विकास प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्पांचा समावेश आहे. भुवन, गोठवल, रातवड या गावाच्या हद्दीत चर्मोद्योग समूह विकास प्रकल्प, तर वाहन उद्योग प्रकल्प भाले, जांबगाव, पहूर, बोनशेत या गावाच्या परिसरात उभारला जाणार आहे. चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पासाठी शासनाचे १०० कोटींचे अनुदान उपलब्ध झाले आहे. 

तलावांची निर्मिती करणार प्रकल्पासाठी लागणारे पाणी हे कुंडलिकाच्या पात्रातून कामत गावातून आणले जाणार आहे. यासाठी १२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या तलावाची निर्मिती केली जाणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे  असून दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पासाठी करारात कारखाने प्रस्तावित होऊ शकतात, असेही खासदरा सुनील तटकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड