शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पनवेलमध्ये वर्षभरात किराणा, भाजीपाला दुकानांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:23 IST

गत वर्षापासून कोरोना संसर्गात वाढ होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली आहेत.

कळंबाेली : गत वर्षापासून कोरोना संसर्गात वाढ होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद झाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन असतानादेखील अत्यावश्यक सेवेतील दुधडेअरी, भाजीपाला, औषधी व किराणा दुकान विक्री करणा-यांची आर्थिक परिस्थिती सुधारली; परंतु इतर व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यापारी मात्र आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे इतर व्यवसाय बंद करत दूधडेअरी, भाजीपाला, किराणा,औषधी दुकाने सुरू करण्यावर पनवेल परिसरातील नागरिकांनी भर दिला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, खांदा कॉलनी, नवीन पनवेल या परिसरात असणारे छोटे-मोठे व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आर्थिक बाजू कोलमडल्याने अखेर दुकान बंद करावे लागल्याचे व्यापारी सांगतात. एक तर दुकानातील मालाची विक्री होत नाही. तसेच कोरोना नियमांचे पालन करत लवकर दुकाने बंद करावी लागतात. गतवर्षी लॉकडाऊनमुळे धंद्यात मंदी आली आहे. बहुतांश व्यवसाय अडचणीत सापडून बंद झाले आहेत. बेरोजगारीचे प्रमाणदेखील वाढले आहे. इतर व्यवसाय करावा तर चालत नाही. पुन्हा लॉकडाऊन पडला, तर गाळ्याचे भाडे, मालात गुंतवलेले पैसे कसे काढायचे, हादेखील प्रश्न व्यापा-यांसमोर उभा आहे. लॉकडाऊन तसेच आता कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आस्थापने नियमानुसार चालवण्यास परवानगी दिली आहे. परंतु व्यवसाय होत नसल्याने अनेक दुकाने बंद झाली आहेत.  दुकाने वाढण्याची कारणे -पनवेल परिसरात अत्यावश्यक सेवेतील दुकानात वाढ झाली आहे. ही दुकाने सुरू करण्यासाठी कमी कामगार त्याचबरोबर प्रशिक्षणाची गरज नाही. छोट्या जागेत हा व्यवसाय सुरू करता येतो. कमी भांडवलात व्यवसाय सुरू होतो. कोरोना काळात लॉकडाऊन असो किंवा नसो, दुकान चालूच राहते. फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांचा औषधी दुकान सुरू करण्याकडे अधिक कल आहे. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची हिम्मतच होत नाही. कोरोनामुळे इतर व्यवसाय चालवणे मुश्किल झाले आहे. अगोदर माझे जनरल स्टोअर्स होते. ते बंद करून यंदा किराणा दुकान सुरू केले. त्यातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी चालतो.    - आनंद चैरसिया , दुकानदार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड