शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

८०० फूट दरीत फेकूनही गर्भवती सुखरूप, पेब किल्ल्याजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:17 AM

माथेरान-नेरळ मिनी ट्रेन रेल्वे ट्रॅकमधील पेब किल्लाजवळ (कड्यावरचा गणपती) गर्भवती पत्नीला ८०० फूट खोल दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. याची माहिती जुम्मापट्टी येथील रहिवासी, तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांना कळताच, यांनी हा प्रकार माथेरान, नेरळ पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, माथेरानमधील सह्याद्री मित्र रेस्क्यू टीम व स्थानिक आदिवासींच्या साहाय्याने महिलेला खोल दरीतून बाहेर काढले आहे.

नेरळ - माथेरान-नेरळ मिनी ट्रेन रेल्वे ट्रॅकमधील पेब किल्लाजवळ (कड्यावरचा गणपती) गर्भवती पत्नीला ८०० फूट खोल दरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी घडली. याची माहिती जुम्मापट्टी येथील रहिवासी, तसेच नेरळ-माथेरान टॅक्सी चालकांना कळताच, यांनी हा प्रकार माथेरान, नेरळ पोलिसांना सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, माथेरानमधील सह्याद्री मित्र रेस्क्यू टीम व स्थानिक आदिवासींच्या साहाय्याने महिलेला खोल दरीतून बाहेर काढले आहे. तिच्या पतीला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, तिने पतीविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे.माथेरान येथील कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी सुरेश पवार पत्नी विजया, तसेच लहान मुलगा आयानसोबत फिरण्यासाठी आले होते. मंत्रालयात ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुरेशचा ९ महिन्यांपूर्वी विजयाशी प्रेमविवाह झाला होता. विजयाला पहिल्या नवºयापासून तीन अपत्ये आहेत. दोन मुले चेन्नई येथील हॉस्टेलमध्ये शिकत असून, लहान मुलगा तिच्यासोबत राहतो. लग्नानंतर विजयाने सुरेशकडे घरी नेण्याचा तगादा लावला होता. रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेशने तिचा काटा काढण्याचे ठरविले.चर्चगेटहून माथेरानला फिरण्याच्या बहाण्याने आलेल्या सुरेशने विजयाला मिनी ट्रेन रेल्वेलगत कड्यावरचा गणपती (पेब किल्ला) या ठिकाणापासून जवळच असलेल्या ८०० फूट दरीत फेकून दिले.नेरळ व माथेरान पोलिसांना जेव्हा एक महिला जखमी अवस्थेत अडकल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी जुम्मापट्टी येथील आदिवासी तरुणांकडून, तसेच वनविभागाच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीमला पाचारण केले. या वेळी आदिवासी तरु णांच्या साह्याने रेस्क्यू टीमने गर्भवती विजयाला खोल दरीतून सुखरूप बाहेर काढले.विजयाला जबर दुखापत झाल्याने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRaigadरायगड