इनायत हुरजूक महाड पोलिसांना शरण

By Admin | Updated: September 3, 2016 02:23 IST2016-09-03T02:23:33+5:302016-09-03T02:23:33+5:30

फेब्रुवारी २०१६ मध्ये इनायत हुरजूकवर महाड शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीवर गुंगीचे औषध देवून बलात्कार करत त्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण सार्वजनिक करण्याची

Inayat surrenders to Hoorajuk Mahad police | इनायत हुरजूक महाड पोलिसांना शरण

इनायत हुरजूक महाड पोलिसांना शरण

दासगाव : फेब्रुवारी २०१६ मध्ये इनायत हुरजूकवर महाड शहर पोलीस ठाण्यात एका तरुणीवर गुंगीचे औषध देवून बलात्कार करत त्याचे चित्रीकरण करून ते चित्रीकरण सार्वजनिक करण्याची धमकी देण्याचे आरोप होते. माणगाव न्यायालयाने जामीन
फेटाळल्यानंतर तो महाड पोलिसांना शरण येत त्याला महाड न्यायालयात हजर केले असता ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
इनायत हुरजूक याच्याविरोधात २९ वर्षांच्या एका तरुणीने १८ फेब्रुवारी रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. इनायत अब्दुला हुरजूक (रा. हरकोल) याच्या सोबत या तरुणीची ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत हुरजूक याने तिला महाडमध्ये येवून ज्यूसमध्ये गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यानंतर गाडीमध्ये तिच्यावर बलात्कार करून चित्रीकरण केले व त्या वेळेपासून तिचा छळ सुरू केला. ही घटना नोव्हेंबर २०१४ मध्ये घडली होती.
२५ डिसेंबर २०१५ रोजी इनायत हुरजूकने ही व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत या तरुणीला कामोठे येथील एका रेसिडेंसी लॉजवर बोलावून पुन्हा बलात्कार केले. गर्भवती राहिल्यानंतर हुरजूक याने तिचा मुंबई येथील एका रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात केला. मानसिक तणावाखाली आलेल्या या तरुणीने महाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हुरजूकने बचावासाठी अटकपूर्व जामीन मिळणेसाठी उच्च न्यायालयात तसेच सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला. मात्र दोन्ही कोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्याने हुरजूक माणगाव न्यायालयास शरण आला.

Web Title: Inayat surrenders to Hoorajuk Mahad police