महाडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात
By Admin | Updated: November 19, 2015 00:25 IST2015-11-19T00:25:56+5:302015-11-19T00:25:56+5:30
मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत

महाडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात
दासगाव : मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी सागरी सुरक्षा अभियान सागर कवच राबविण्यात येते. याप्रमाणे बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून ३६ तासांचे महाड सागरी मार्गावर असणाऱ्या टोल फाटा, दासगाव, सव, शिरगाव येथे महाड तालुका, शहर पोलीस सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.
१९९३ ला मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे जीव घेतले होते. हे स्फोटक पदार्थ खाडीमार्गे आणून पोलिसांना चकवा देत मुंबईमध्ये आणले होते. यानंतर खाडीतून दहशतवादी कसे आले असतील, स्फोटके कशी आणली असतील, पोलिसांनी याबाबत कशा प्रकारे काळजी घ्यावी याकरिता हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात पोलीस खाते, कस्टम विभाग, तटरक्षक दलाचा समावेश आहे. (वार्ताहर)