अवैध वाळू जप्त
By Admin | Updated: April 14, 2017 03:10 IST2017-04-14T03:10:11+5:302017-04-14T03:10:11+5:30
शासकीय परवानगी न घेता, एक हजार २० ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू जप्त
महाड : शासकीय परवानगी न घेता, एक हजार २० ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार औदुंबर पाटील आणि नायब तहसीलदार महेंद्र बेलदार-पाटील यांनी वीर टेंबी वाडी येथे काळ नदीच्या पात्रालगत असलेल्या प्लॉटवर छापा मारून ही वाळू जप्त केली.
या प्रकरणी तलाठी संदेश पानसरे यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांविरु ध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत. दरम्यान, ११ एप्रिल रोजी ही वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रक महसूल विभागाने जप्त केला आहे. ट्रकसह ५.७३ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून याची एकूण किंमत १० लाख २६ हजार ६१६ रुपये आहे.
या प्रकरणी दोघांविरु ध्द महाड तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक बामणे हे करीत आहेत. (वार्ताहर)