आयआयटी टेकफेस्टची तुतारी वाजली
By Admin | Updated: October 12, 2014 00:48 IST2014-10-12T00:48:29+5:302014-10-12T00:48:29+5:30
आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट समजल्या जाणा:या ‘आयआयटी’ची तुतारी वाजली आहे. टेक्नॉलॉजीसह महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरही टेकफेस्टचे लक्ष आहे.

आयआयटी टेकफेस्टची तुतारी वाजली
>मुंबई : आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट समजल्या जाणा:या ‘आयआयटी’ची तुतारी वाजली आहे. टेक्नॉलॉजीसह महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरही टेकफेस्टचे लक्ष आहे. यासाठी खास ‘रोअर’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा फेस्ट 2 ते 4 जानेवारीदरम्यान रंगणार आहे.
फक्त टेक्नॉलॉजीच नव्हे, तर स्त्री सुरक्षेवरही टेकफेस्टचं लक्ष आहे. टेकफेस्टमध्ये ‘रोअर’ उपक्रमात एक स्पर्धा घेतली जाईल, जी देशभरातील तरुणांसाठी खुली असून विजेत्याला तब्बल 2 लाखांचे बक्षीसही मिळणार आहे. या स्पर्धकांना दिलेल्या टास्कपैकी कोणताही एक टास्क पूर्ण करायचा आहे.
हे रिपोर्ट्स पाठवण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. इच्छुक स्पर्धकांनी 1ं13ीूँी23.1ॅ या मेल आयडीवर आपला रिपोर्ट पाठवायचा आहे. यातील टॉप 2क् संघांची नावे टेकफेस्टच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येतील. अंतिम निकाल टेकफेस्टदरम्यान सादर करण्यात येतील. (प्रतिनिधी)
क्रिएट अ प्लॅटफॉर्म :या टास्कमध्ये, मुली आपले कलागुण सादर करू शकतील असं एक वैशिष्टय़पूर्ण व्यासपीठ या टास्कमध्ये तयार करायचे आहे. यात डिजिटल किंवा टेक्नॉलॉजीकल सोल्युशनसुद्धा स्पर्धक देऊ शकतात.
मोस्ट इनोव्हेटिव्ह कॅम्पेन :या टास्कमध्ये सामाजिक बंधन झुगारून मुली स्वत:चे विचार जगापुढे मांडू शकतील, असे कॅम्पेन स्पर्धकांना तयार करायचे आहे.
व्हिडीओ मेकिंग : या टास्कमध्ये स्पर्धकांना ‘व्हॉइसेस - मेन स्पीक ऑन जेंडर व्हायोलन्स’ ही थीम देण्यात आली आहे. या थीमवर 1क्क् सेकंदांचा व्हिडीओ बनवायचा आहे. यात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओमध्ये एकही मुलगी दिसता कामा नये.
लोगो डिझायनिंग : यात एम्पॉवर्ड वूमेन, या थीमवर आधारित एक लोगो स्पर्धकांना बनवायचा आहे. हा लोगो राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यात येईल. जिंकलेला लोगो हा ‘द सेकंड मेन एंगेज ग्लोबल सिंपोङिायम 2क्14 - मेन अँड बॉइज फॉर जेंडर जस्टिस’ या कार्यक्रमात प्रसिद्ध केला जाईल. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे 1क् ते 13 नोव्हेंबरला होणार आहे.