शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

खासदार झाल्यास भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:30 IST

मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले.

कार्लेखिंड : मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या काळात सामान्य नागरिकांना वाईट दिवस अनुभवावे लागले. रोजगार, नोटाबंदी, जीएसटी यामुळे अनेक व्यवसाय बुडाले. आमचे सरकार होते तेव्हा जीएसटी कायदा लागू करण्याचे काम आम्ही करत होतो. त्या वेळी ज्या ठिकाणी भाजप सरकार होते त्यांनी तिथे विरोध केला होता. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना या आरसीएफ प्रकल्पाला चालना दिली होती. तरुण सुशिक्षित पिढीला नोकरी लावण्याचे काम आम्ही केले होते. नागोठणे येथील आयपीसीएल कंपनीतील गेल्या चार-सहा महिन्यांमध्ये मी निवृत्त भूमिपुत्रांच्या मुलांना आयपीसीएल कंपनीमध्ये सामावून घेण्याचे काम केले आहे. मी खासदार झाल्यावर येथील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवेन, असे आश्वासन आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले.रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०१९ चे उमेदवार सुनिल दत्तात्रेय तटकरे यांच्या प्रचारार्थ खडताळपूल येथे आयोजित करण्यात आली होती, या वेळी तटकरे बोलत होते. राजकारणाबरोबरच समाजकारणाचे काम पाटील आणि तटकरे कुटुंबीयांच्या तीन पिढ्या करत आहेत. आमची संस्थाने खालसा करण्याची वार्ता जे करत आहेत ते करू शकत नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला. येथील मच्छीमार बांधवाचे प्रश्न आमच्या शासनाच्या काळात मांडले होते. त्या वेळी मांडवा जेटीची उभारणी आम्ही केली आहे. येथील पर्यटनाला चालना मिळाली. अलिबाग रेल्वेचे प्रश्न का उपेक्षित आहेत. गीते सहा वेळा खासदार झाले; परंतु आपल्या खात्यामार्फत कोणतेही काम त्यांनी केलेले नाही. या राज्यामध्ये आपल्या खात्यातून एकही कारखाना उभारलात का? असा खडा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून या तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या अटीवर सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला आहे, असे नमूद केले. २००९ च्या निवडणुकीत गीतेंना आरसीएफ प्रकल्पग्रस्त आणि पीएपीचे प्रलंबित प्रश्नांच्या अटीवर मदत करण्यात आली होती; परंतु गीते यांच्याकडे वेळोवेळी आठवण करूनही अजूनपर्यंत पश्न मार्गी लावले नाहीत, त्यामुळे आम्ही तटकरे यांना पाठिंबा देत आहोत. या प्रकल्पातील निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना त्या जागी नोकरीला लावणे. स्थानिकांच्या जमिनी घेऊन येथील तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत. कोळी समाजाच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे.
राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्या जागा कोळी बांधवांच्या मालकीच्या आहेत, असे एक ना अनेक प्रश्न केंद्रात लावून धरण्याचे काम तटकरे यांनी करावेत. केंद्रीय निधी रायगड जिल्ह्याला अधिक कसा मिळेल, असे प्रयत्न केले पाहिजेत. या सरकारने आरसीएफ थळ प्रकल्प -३ येण्यापासून रोखले आहे. हा कारखाना खासगीकरणाच्या घशात घालण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि खासगीकरण झाले तर येथील तरुण देशोधडीला लागेल, असे पाटील म्हणाले.या वेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, राजिप उपाध्यक्ष, आस्वाद पाटील, राजिप सदस्य चित्रा पाटील, नृपाल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे