ठाणे मराठा मूक मोर्चात टिटवाळ्यातून शेकडो मराठा बांधव

By Admin | Updated: October 16, 2016 15:24 IST2016-10-16T15:23:03+5:302016-10-16T15:24:03+5:30

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरक्षण मुद्दा घेऊन मराठा समाज पेटून उठला आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आरक्षणाचे पडसाद पडत मोर्चे काढण्यात आले

Hundreds of Maratha brothers from Thaat Maratha mute march | ठाणे मराठा मूक मोर्चात टिटवाळ्यातून शेकडो मराठा बांधव

ठाणे मराठा मूक मोर्चात टिटवाळ्यातून शेकडो मराठा बांधव

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. १६  :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आरक्षण मुद्दा घेऊन मराठा समाज पेटून उठला आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आरक्षणाचे पडसाद पडत मोर्चे काढण्यात आले. लाखो च्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले होते. याच धर्तीवर ठाण्यात मराठा मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यात टिटवाळा येथील शेकडो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
आपल्या विविध मागण्यांसाठी व आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातल राज्यातील मराठा समाज पेटून उठला आहे.

औरंगाबाद, धुळे, नांदेड, नाशिक, सातारा, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नवीन मुंबई, बुलढाणा आदी जिल्हातील ठिकाणी लाखो च्या संख्येने मराठी बांधव सहभागी होऊन मूक मोर्चा काढण्यात आला. याच धर्तीवर रविवार दिनांक 16 ठाणे जिल्हात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अलोट मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. त्यात टिटवाळ्यात शेकडो मराठा बांधव सकाळी मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: Hundreds of Maratha brothers from Thaat Maratha mute march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.