शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 3:40 AM

सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता स्पर्धेचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वधर्म, जातपात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे. असा विचार प्रत्येकाच्या अंतकरणातून आला पाहिजे.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता स्पर्धेचा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वधर्म, जातपात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे. असा विचार प्रत्येकाच्या अंतकरणातून आला पाहिजे. चांगल्या विचारांची भूमिका ही नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. ‘लोकमत’ आणि रायगड पोलीस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसविण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले आहेत.‘लोकमत’ आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने जिल्ह्यात आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ््याचे शानदार आयोजन पीएनपी नाट्यगृहात गुरुवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेतील विजयी गणेश मंडळांना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.मानवाच्या अंतकरणामध्ये अवगुण आणि सद्गुण असे दोन भाग असतात. अवगुणांमुळे मानव समाजाला त्रास होतो. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, द्वेष, संशय असे वाईट विचार अंतकरणातूनच येतात. त्याची शिक्षा मात्र शरीराला भोगावी लागते. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. कायद्याच्या राज्यात चुकीला शिक्षा झालीच पाहिजे, असे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले. सद्विचार चांगल्या कामात वापरण्यासाठी मनाचा अभ्यास चांगला असला पाहिजे आणि हेच विचार बैठकीच्या माध्यमातून रुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या विचारांनी आयुष्य सुखी होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.बुवाबाजी, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवू नका. चांगले विचारच आयुष्याला संरक्षण देतील. बालवयात चांगले संस्कार झाल्यास चांगली सुसंस्कृत मने निर्माण होऊन देश समृद्धीला येईल, असे परखड मतही डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. देशभर बैठकीच्या माध्यमातून बाल संस्कार केंद्रे चालवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सार्वजनिक मंडळांकडे मोठ्या संख्येने मानव शक्ती आहे. राष्ट्रहितासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मंडळांनी समाज प्रबोधनासाठी असेच पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सणासुदीच्या काळात दिवसरात्र रस्त्यावर राहून समाजाला आनंद देण्याचे पोलिसांचे कार्य महान आहे. रस्तावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी समाजानेही स्वत:ला शिस्त लावून घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी प्रकाश भाऊ धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर विमल राजपूत, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक विजय सिंग, वृत्तपत्र वितरक संजय कर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे २७४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. तालुका स्तरावर तीन मंडळांची निवड परीक्षक मंडळाने केल्यावर त्यांतून ११ गणेशोत्सव मंडळांची निवड जिल्हास्तरीय समितीने जिल्हास्तरीय पारितोषिकांकरिता केली होती. पूर्वआवाहनानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेकरिता ठेवलेल्या विषयांना अनुसरून देखावे व आरास केली होती.मेक इन इंडियास पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामस्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर अत्यंत कल्पकतेने कार्यकर्त्यांनी देखावे साकारून लोकप्रबोधन केले. डीजे वा अन्य मोठ्या आवाजांच्या स्पीकर्सचा वापर करणार नाही, असा निर्णय अनेक गणेशोत्सव मंडळांनी स्वेच्छेने घेतला होता. यामुळे ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.१गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रहिताच्या कामात हातभार लावण्यासाठी शाळा, गरीब खेळाडू, समुद्रकिनारे दत्तक घ्यावेत. स्पर्धा परीक्षांसाठी गरजूंना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वाेतोपरी मदत करेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या कमानी लागल्या आहेत. यातून जनसामान्यांमध्ये असलेला त्यांच्या कार्याचा प्रभाव दिसून येतो. अशा महानविभूतींच्या सानिध्यात काम करायला मिळणे हे भाग्य समजतो, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.२रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्याच जिल्ह्यामध्ये डॉ. धर्माधिकारी परिवार समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. त्याच जिल्ह्यात काम करायला मिळण्यासाठी भाग्य लागते, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. ‘लोकमत’ने समाजिक कार्यात रायगड पोलिसांना सामावून घेतले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करून, असे उपक्रम घेण्याचे आवाहन केले.३नुपूर नृत्य संस्थेच्या ऐश्वर्या आणि श्राव्या यांनी गणेशस्तवन नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवयित्री सुजाता पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी व्यक्त केले.सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील पारितोषिक विजेती गणेशोत्सव मंडळेप्रथम पारितोषिकरु.१०,००० आणि स्मृतिचिन्हआदर्श मित्रमंडळ, अलिबाग.द्वितीय पारितोषिकरु.७००० आणि स्मृतिचिन्हसंत रोहिदासनगर सार्व. गणपती मंडळ, महाड.तृतीय पारितोषिकरु.५००० आणि स्मृतिचिन्हबालमित्र मंडळ, वरची खोपोली, खोपोली.विशेष उल्लेखनीय पारितोषिक १००० रु पये आणि स्मृतिचिन्ह१नवतरुण मित्रमंडळ,खानाव, ता. अलिबाग.२सार्वजनिक गणेश मंडळ,कर्जत बाजारपेठ, कर्जत.३न्यूस्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तरेआळी, पेण.४काळकाई माता क्रीडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोलादपूर.५श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय,श्रीवर्धन.६आदर्श समता नगर रहिवासी मंडळ, माणगाव.७श्री भैरवनाथ मित्रमंडळ,परळी-पाली.८सार्वजनिक गणेशोत्सव,भाटे वाचनालय, रोहा.गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावर विनाकोंडी वाहतूक सुरळीत ठेवणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा गौरवजिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुखपोलीस निरीक्षकमनोज म्हात्रेनियंत्रण कक्षपोलीस निरीक्षकदादासाहेब सिदा घुटुकडेवडखळ पोलीस ठाणेपोलीस नाईकमहेश काशिनाथ रुईकरमहाड शहर पोलीस ठाणेपोलीस नाईकभानुदास अनंत म्हात्रे.वाहतूक शाखापोलीस हवालदारदिनेश पांडुरंग थळेवाहतूक शाखापोलीस हवालदारप्रवीण सुदाम पिंपरकरवाहतूक शाखापोलीस हवालदारसुनील नामदेव गायकवाडवाहतूक शाखापोलीस हवालदारविशाल विजय येलवेवाहतूक शाखापोलीस नाईकअक्षय एकनाथ जाधववाहतूक शाखापोलीस नाईकनीतेश पांडुरंग कोंडाळकरवाहतूक शाखामहिला पोलीस शिपाईसंजीवनी गावडू पाटीलवाहतूक शाखापोलीस शिपाईसुहास प्रल्हाद काबुगडे