आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिरांत प्रचंड गर्दी
By Admin | Updated: July 27, 2015 23:33 IST2015-07-27T23:33:10+5:302015-07-27T23:33:10+5:30
मुरुड तालुक्यातील जुनी पेठ परिसरात सुमारे १५० वर्षांपेक्षा जुने मंदिर असून शहरात व ग्रामीण भागात हे एकमेव विठ्ठल मंदिर आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात

आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिरांत प्रचंड गर्दी
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील जुनी पेठ परिसरात सुमारे १५० वर्षांपेक्षा जुने मंदिर असून शहरात व ग्रामीण भागात हे एकमेव विठ्ठल मंदिर आहे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका असे म्हटले जाते. वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सर्व भक्त विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. एकादशीला पहाटे तुळशी वाहून विष्णूपूजन करण्यात येते. या पूजेचा मान विश्वास चव्हाण व त्यांच्या पत्नी वृषाली चव्हाण यांना मिळाला. पहाटे काकड आरती व महापूजा झाल्यानंतर मंदिर दिवसभर सर्वांसाठी खुले होते. भजनी मंडळी सकाळपासून भजन व कीर्तन करण्यात दंग झाले होते यामुळे सर्वत्र विठ्ठलमय वातावरण होते. आज सकाळपासून पाऊस पडत असल्याने सर्व विठ्ठल भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद होता. तर शेतकऱ्यांनी विठ्ठलाला चांगल्या पावसासाठी साकडे घातले. यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)