शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा आरोपी असूनही भरत गोगावले मंत्रिपदी कसे? त्यांची चौकशी का नाही? उच्च न्यायालयाचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 06:33 IST

राज्यात कायद्याचे राज्य आहे का? कोर्टाचा सवाल; महाड हाणामारी प्रकरणाची सुनावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: “पोलिसांनी कॅबिनेटमंत्री भरत गोगावले यांना चौकशीसाठी बोलावले का? आरोपी मुलगा मंत्री असणाऱ्या वडिलांच्या संपर्कात आहे, पण पोलिसांना सापडत नाही. राज्यात कायद्याचे राज्य आहे का? गोगावलेंना चौकशीला बोलवा. मुलगा संपर्कात आहे की नाही, हे ते सांगतील. मुलगा आरोपी असतानाही गोगावले अजून मंत्रिपदावर कसे आहेत”, असा संतप्त सवालही न्यायालयाने केला.

महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिंदेसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे नेते माणिकराव जगताप यांचा मुलगा श्रीयांश जगताप आणि पुतण्या महेश जगताप यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे याचिकांवर सुनावणी झाली. विकास गोगावलेला अटक केली का? असा प्रश्न न्यायालयाने महाधिवक्ता मिलिंद साठे यांना केला. त्यावर साठे यांनी, त्याला पोलिस शोधत असल्याचे उत्तर दिले. “आरोपी सापडला नाही तर एनबीडब्ल्यू जारी करू आणि तरीही हाती लागला नाही तर पुढील कारवाई करू”, असे साठे यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, भरत गोगावले यांनी आपला मुलगा फरार असल्याचे वृत्त फेटाळले असून, तो आपल्या संपर्कात असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला दिल्याची बाब जगताप यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावरून न्यायालयाने संताप आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत तीव्र चिंताही व्यक्त करताना एका मंत्र्यांचा मुलगा गुन्हा दाखल होऊन फरार असताना त्या मंत्र्याविरोधात एकही शब्द न बोलण्याइतके सरकार हतबल आहेत का? एका मंत्र्याचा आरोपी मुलगा मंत्र्यांच्या संपर्कात आहे, पण पोलिसांना कसा सापडत नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केला.

पोलिसांना शरण येण्यास सांगा

न्यायालयाने पहिल्या सत्रात महाधिवक्ता साठे यांना मुख्यमंत्री आणि गोगावले यांच्याकडून सूचना घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर साठे यांनी, “पोलिस लगेचच विकास गोगावलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. भरत गोगावले आपल्या मुलाशी बोलतील”, असे स्पष्ट केले.

“केवळ संपर्क साधू नका, त्यांना शुक्रवारी सुनावणीपूर्वी पोलिसांना शरण जाण्यास सांगा. अन्यथा आम्ही आदेश देऊ. तुमच्यावर (पोलिसांवर) दबाव असेल, मात्र न्यायालयावर दबाव नाही”, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.

श्रीयांश जगताप यांना दिलासा

न्यायालयाने श्रीयांश जगताप यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. ‘राज्यात कायद्याचे राज्य आहे, हे दाखविण्यासाठी आम्ही हा अंतरिम दिलासा देत आहोत,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी ठेवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Court questions minister's position despite son's accused status, demands inquiry.

Web Summary : The High Court questioned how Bharat Gogawale remains a minister despite his son being an accused, demanding an inquiry. The court expressed concern over the police's inability to locate Gogawale's son, despite claims he is in contact with his father, and questioned the rule of law in Maharashtra.
टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट