देगावमध्ये घराला आग

By Admin | Updated: January 15, 2017 05:36 IST2017-01-15T05:36:13+5:302017-01-15T05:36:13+5:30

माणगाव तालुक्यातील देगाव येथील एका कौलारू घरास रात्रीच्या सुमारास अचानक लाग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन कडाक्याच्या थंडीत गरीब

The house fire in the house | देगावमध्ये घराला आग

देगावमध्ये घराला आग

माणगाव : माणगाव तालुक्यातील देगाव येथील एका कौलारू घरास रात्रीच्या सुमारास अचानक लाग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ऐन कडाक्याच्या थंडीत गरीब कुटुंबाला उघड्यावर राहावे लागले.
देगावातील लक्ष्मीबाई शिवराम गायकवाड या महिला घरात एकट्या होत्या. रात्री जेवण झाल्यावर काही कामासाठी शेजारी गेल्या असता, घरात लावलेल्या रॉकेलच्या दिव्याची वात उंदराने नेऊन लाकडी सामानावर टाकल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु तोपर्यंत घराची कौले, वासे, रिपा, तसेच भांडी, कपडे व धान्याबरोबरच इतर सामानही आगीत भस्मसात झाले होते. आगीमुळे गायकवाड यांचे एक लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
(वार्ताहर)

Web Title: The house fire in the house