शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:18 IST

श्रीवर्धन रुग्णालय कर्मचारी मारहाण प्रकरण : घंटानाद करून व्यवस्थेचे वेधले लक्ष; जिल्ह्यात उमटले पडसाद

अलिबाग : श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी अक्षय कांबळे यांना कामावर असताना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ आणि मारहाण केली. या निषेधार्थ उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धरणे धरून कामबंद आंदोलन केले होते. आरोपींवर कारवाई न झाल्याने श्रीवर्धनमधील सरकारी कर्मचाºयांच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन केले. त्याचप्रमाणे दुपारी घंटानाद करून व्यवस्थेचे या निषेधार्थ घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सरकारी कर्मचाºयांवर सातत्याने असे हल्ले होत आहेत, त्यामुळे काम करूनही असे अपमानास्पद प्रकार घडत असतील तर ते निषेधार्ह आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी गुन्हेगारांना शासन हे झालेच पाहिजे अशी मागणी राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे यांनी केली. असे प्रकार वेळीच रोखले नाही तर ते समाजासाठी घातक ठरणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या सहकाºयांना बळ देण्यासाठी आपली एकजूट असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगून सहकाºयांना बळ मिळावे, यासाठी सरकारी कर्मचारी मस्टरवर सही करून काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याचे स्पष्ट केले.

आरोपींवर कारवाई न झाल्याने मंगळवारी जिल्हाध्यक्ष संदीप नागे, उपाध्यक्ष राकेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन येथे निदर्शने आंदोलन केले. तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरून घोषणा देण्यात आल्या.श्रीवर्धनमध्ये कर्मचाºयांचे तीन दिवसांपासून आंदोलनशनिवारी रात्री ९ च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील नियोजित कामगिरी बजावणाºया अधिपरिचारक अक्षय अजित कांबळे (२९) यांना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ३८ कर्मचाºयांनी रविवारपासून दिवसभर कामबंद आंदोलन छेडले आहे. त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे. या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या १०४७ सभासदांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

श्रीवर्धन पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, श्रीवर्धन नवीपेठेतील समीर सत्यवान थळे याने प्रशांत केतकर यास रक्तदाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात आणले. तेव्हा रुग्णालयात नियोजित कामगिरीवरील डॉक्टरांनी प्रशांत केतकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले, त्या प्रसंगी सरकारी रुग्णालयातील नियमानुसार रुग्ण नोंदणी पेपरसाठी दहा रुपये शुल्काची मागणी तक्रारदार यांनी समीर थळे व एका अज्ञात व्यक्तीकडे केली. त्याचा राग मनात धरून सत्यवान थळे, समीर थळे, देवेंद्र भुसाने व एका अज्ञात व्यक्तीने तक्रारदार अक्षय अजित कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच त्याच्या गळ्यातील चांदीची तीन तोळा अंदाजे मूल्य १००० रुपयांची चेन हिसकावून घेतली व त्यांच्या ताब्यातील मोबाइलचे नुकसान केले. रुग्णालयातील कर्मचाºयांच्या तक्रारीनुसार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार समीर सत्यवान थळे, देवेंद्र भुसाने व संतोषतांडेल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी सत्यवान पंढरीनाथ थळे फरार झाला आहे. या मारहाण प्रकरणामुळे रविवारपासून श्रीवर्धन तालुक्यातील सरकारी आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड