शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:12 IST

वडखळ, खोपोली, माणगाव वाहतूककोंडीची प्रमुख ठिकाणे

- सिकंदर अनवारे दासगाव : दरवर्षी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात वाहन चालकांना डोकेदुखी बनतो. यंदा देखील महामार्गाची दैना झाली असून या मार्गाने प्रवास करणे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणानंतर पळस्पे ते इंदापूर दरम्याच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तीच अवस्था दुसऱ्या टप्प्यातील पाली आणि खोपोली मार्गाच्या रुंदीकरणामुळे झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास अडचणीतून होणार असून त्यासाठी तासन्तास मोठी कसरत करावी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पळस्पे ते इंदापूर रखडल्यानंतर गेली सहा वर्षे या मार्गावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के वाहनचालकांनी पनवेल ते कोकण मार्ग बंद करत पनवेल द्रुतगती मार्गाने खोपोली-पाली-वाकण असा मार्ग अवलंबला होता. मात्र त्याही मार्गाचे यंदा रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. आता चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे इंदापूरपासून चिपळूणपर्यंत काम सुरू झाले आहे. या दुसºया टप्प्याच्या अर्धवट कामामुळे चालकांसह प्रवासीही त्रस्त असून कशेडी घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. पनवेल ते चिपळूण असा सध्याचा प्रवास मोठा कसरतीचा आणि अडचणीचा झाला आहे. सध्या पनवेल ते महाड २ तासाच्या प्रवासाला तब्बल पाच ते सहा तास लागत आहेत. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.कोकणात जाणाºया प्रवाशांसाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सोयीचा आहे. दरवर्षी याच मार्गावर गणपती सणामध्ये मोठ्या रांगा लागतात. दुसरा मार्ग कोकणात जाण्यासाठी असला तरी या मार्गापेक्षा जवळपास १०० किमी अंतराचा फरक पडतो. यंदा पनवेल ते इंदापूर महामार्गावरील खड्डे, पाली- खोपोली मार्गाचे रुंदीकरण आणि दुसºया टप्प्याचे रुंदीकरण या तिन्ही अडचणींना चाकरमान्यांना सामोरे जावे लागणार आहे. शासनाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचा दावा केला जात असला तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसात उखडून जात आहेत.कशेडी घाटाची भीती कायमयंदा पावसाचा जोर जास्त आहे. कशेडी घाटातील काही भाग खचला असून अतिवृष्टी झाल्यास घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात येतो.घाट बंद पडल्यानंतर याला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर विन्हेरे महाड असा मार्ग आहे. मात्र त्याही मार्गावर एक दोन ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून हा मार्ग अरुंद अवस्थेत आहे.माणगाव आणि वडखळ आजही वाहतुकीस डोकेदुखीमुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते महाड अंतरापर्यंत जवळपास दोन ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. वडखळ आणि माणगाव पेण ते वडखळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.या ठिकाणाहून अलिबाग आणि कोकणातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात अलिबागकडे जाणारी असतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे अवजड वाहनांची गती कमी होते आणि या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.त्यामुळे या दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन-दोन तीन-तीन तास लागतात. मात्र गणपती सणामध्ये हजारो वाहनांची संख्या असल्याने या ठिकाणी चांगलीच कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यानंतर मधला टप्पा खुला असला तरी पुन्हा माणगाव या ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सण असो किंवा इतर वेळी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असो या ठिकाणचा वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड