शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 23:56 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सिकंदर अनवारे दासगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होतात. यंदा कोरोनामुळे हे प्रमाण कमी झाले असले तरी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. २५ अधिकारी आणि २९९ कर्मचारी तैनात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात नोकरीसाठी गेलेले चाकरमानी आपल्या गावी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध आले असून आपल्या गावी येणाºया चाकरमान्यांनादेखील काही दिवस क्वारंटाइन केले जाणार आहे. अशा परस्थितीतदेखील कोकणात चाकरमान्यांनी येण्यास सुरुवात केली असल्याने यांना प्रवासामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत.पनवेल ते कोकणाच्या तळापर्यंत जवळपास ५५० किलोमीटरचे अंतर आहे. या अंतरामध्ये महामार्ग वाहतूक शाखेच्या पळस्पे, वाकण, महाड, कशेडी, चिपळूण, हातखंबे आणि कसाल अशा सात चौक्या आहेत. या ठिकाणी सध्या ५ अधिकारी आणि १९९ कर्मचारी काम करत आहेत. दरवर्षी गणपती सणासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पर्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यामुळे गावामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. लॉकडॉऊनमुळे हे काम बंद होते. त्यामुळे जुन्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशा परिस्थितीत कोकणात जाणाºया चाकरमान्यांना प्रवासात कोणतेही त्रास होऊ नये यासाठी महामार्ग वाहतूक शाखा पोलीस सज्ज झाले आहेत. मात्र यंदा बाहेरून या बंदोबस्तासाठी २० अधिकारी आणि १०० कर्मचारी अधिक मागवण्यात आले आहेत. त्यामुळे सात चौक्यांवर असलेल्या ५ अधिकाºयांमध्ये वाढ होत २५ अधिकारी झाले असून कर्मचाºयांमध्येदेखील १०० ने वाढ झाली आहे. यामुळे कर्मचाºयांची संख्या २९९ झाली आहे. हा बंदोबस्त बुधवारपासून सुरू झाला असून २ सप्टेंबरपर्यंत महामार्गावर तैनात राहणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी दिली.>सहा ठिकाणी वाहतूक पोलीस तैनातमहामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी आलेल्या नियोजनाप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. या शाखेची हद्द ६० किलोमीटर एवढी आहे. १ अधिकारी आणि ५ कर्मचारी कामकाज पाहत असल्याने एवढी मोठी हद्द सांभाळणे अवघड होते. त्यामुळे या शाखेत गणपती सणासाठी १ अधिकारी आणि २२ कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. या शाखेमध्ये आता २ अधिकारी आणि २७ कर्मचारी झाल्यामुळे चाकरमान्यांना या हद्दीमध्ये कोणतीच अडचण निर्माण होणार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक वाय.एम. गायकवाड यांनी सांगितले आहे. या हद्दीमध्ये माणगाव, लोणारे, नातेखिंड, महाड एसटी डेपोसमोर, राजेवाडी फाटा आणि पोलादपूर असे सहा पॉइंट तयार करण्यात आले असून या ठिकाणी सतत पोलीस तैनात राहणार आहेत. मोबाइल व्हॅन मोटार बाइक पोलीस सतत गस्त घालणार आहेत. काही अडचण निर्माण झाल्यास जे.सी.बी., रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या असून दोन पॉइंटवर सीसीटीव्हीची नजरदेखील राहणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव