शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
3
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
4
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
5
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
6
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
7
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
8
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
9
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
10
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
11
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
12
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
13
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
14
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
15
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
16
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
17
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
18
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
19
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
20
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

महामार्ग पोलीस केंद्राची चौकी होणार बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:13 IST

चौपदरीकरणाचे काम : सुरक्षेच्या दृष्टीने दासगाव येथे चौकीची मागणी

- सिकंदर अनवारे 

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या महाड येथील महामार्ग पोलीस केंद्राची चौकी चौपदरीकरणाच्या कामात बाधित होणार आहे. या चौकीला नवीन जागा अद्याप देण्यात आली नसली तरी ही चौकी महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. महाडजवळ असलेल्या दासगाव गावालगत ही चौकी असावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील गांधारपाले येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र (चौकी) आहे. महामार्गावर वाहतूक व्यवस्था पाहणे, आणीबाणीच्या प्रसंगी वाहनचालकांना व प्रवाशांना मदत करणे तसेच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी अशी केंद्र व तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. महाड येथील हे केंद्र ७ मार्च १९८८ सुरू करण्यात आले. आज ३० वर्षांनंतरही या ठिकाणी महामार्ग पोलीस विभागाची स्वतंत्र इमारत नसल्याने कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. केंबुर्ली गावाजवळ असलेली पत्र्याची पोलीस चौकी ही महामार्ग चौपदरीकरण कामात बाधित होत असून महामार्गावर नवीन पोलीस चौकीसाठी जागा मिळणे आवश्यक आहे. महाड पोलीस केंद्राची हद्द ही इंदापूर ते पोलादपूरपर्यंत आहे.

इंदापूर ते पोलादपूर दरम्यान मध्यवर्ती ठिकाणी या चौकीला जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. चौपदरीकरण कामानंतर ही पोलीस चौकी सावित्री पुलानजीक स्थलांतर करण्याची शक्यता आहे. याठिकाणी टोल नाका देखील वसवला जाणार आहे. मात्र महामार्ग पोलीस विभागाचे क्षेत्र पाहता इंदापूर ते पोलादपूर दरम्यान दासगाव हे मध्यवर्ती आणि सर्व सोयीने युक्त असे गाव असल्याने या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी होत आहे.पोलीस निरीक्षकाची तीन पदे रिक्तच्या पोलीस मदत केंंद्रतंर्गत इंदापूर ते पोलादपूर हा महामार्गाचा भाग येतो. या मार्गावर दिवस-रात्र पेट्रोलिंग (गस्त)चे कामही पोलिसांना करावे लागते. यासाठी असलेली जीप नादुरु स्त आहे. या मदतकेंद्रात अ‍ॅम्ब्युलन्स व क्रे नही उपलब्ध नाही.च्आवश्यक असणारा कर्मचारी वर्गही याठिकाणी पुरविला जात नसल्याने इतर पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागतो. या केंद्रात पोलीस निरीक्षकाची तीन पदे आहेत. ती सर्व रिक्त आहेत. तर पोलीस कर्मचाऱ्यांची ३० पदे असून या ठिकाणी केवळ ८ कर्मचारीच काम करत आहेत.अपुºया सुविधाच्सध्या महामार्गाशेजारी एका अपुºया जागेत कंटेनर व पत्र्याचा वापर करून तात्पुरती पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. चोवीस तास कार्यरत असलेल्या या मदतकेंद्रात पिण्यासाठी साधे पाणीही उपलब्ध नाही. पावसाळ्यात एका डोंगरातून येणारे पाणी पिंपामध्ये साठवून हे कर्मचारी आपली पाण्याची गरज भागवतात तर उन्हाळ्यात कॅन आणले जातात. छत पत्र्याचे असल्याने कडक उन्हाळ्यात ते तापते व घामाच्या धारा पुसत पोलिसांना काम करावे लागते. यातच बाजूला जेवणाची व निवासाची तात्पुरती सोय आहे. तीस वर्षांनंतरही या कर्मचाºयांना कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्यासाठी यंत्रणेला वेळ मिळालेला नाही. 

कर्मचारी कमतरता व अन्य बाबींबाबत वरिष्ठ पातळीवर कळवले जात असते तेथूनच याकरिता पाठपुरावा सुरू आहे.- सचिन गवळी, निरीक्षक महामार्ग पोलीस

टॅग्स :highwayमहामार्ग