शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:59 AM

कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

- कांता हाबळे नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार होण्यासाठी चढाओढ असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आपली उमेदवारी पक्षाकडे नोंद करीत आहेत. त्यात आघाडी तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुक वाढले असतानाच आता तिकडे शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कर्जत मतदारसंघात येत आहे. दरम्यान, कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला हे या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे स्पष्ट होणार आहे; पण मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पाडले आणि कोणी कोणाला मदत केली यांची गणिते बांधली जात असून त्यानुसार उट्टे काढण्याची रणनीतीही आखली जात असेल यात शंका नाही.कर्जत या दोन लाख ८९ हजार मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक प्रमाणात राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) यांच्या महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-मनसे यांची आघाडी अशी लढत झाली होती. त्या वेळी मतांची झालेली गोळाबेरीज ही आघाडी आणि युतीसाठी फारशी दिलासादायक बाब नाही. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला आहे हे या निवडणुकीत अधोरेखित होणार आहे. कारण, एकेकाळी या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी तीन वेळा आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे आमचाच बालेकिल्ला म्हणणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा निवडणुकीत करून दाखवता आले नसल्याने कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरस आहे. कर्जतमध्ये लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांची लढत असली तरी कोणीही आपला बालेकिल्ला म्हणू शकत नाही, अशी स्थिती या मतदारसंघात सर्व राजकीय पक्षांची आहे.कर्जतमध्ये सर्व जण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीची तारीख झाली नसल्याने प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीतील आमने-सामने उभे राहणाºया दावेदार पक्षांनी आतापासून दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीमध्ये आमदार असलेले सुरेश लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे; पण त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा आमदारकीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले होते; परंतु स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापला राष्ट्रवादीने आसमान दाखवले आहे हे शेकाप विसरले नसेल, अशीही चर्चा आहे. तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांची मते आपोआप कमी होणार आहेत; पण राष्ट्रवादीमधील अन्य इच्छुक असलेले दत्तात्रेय मसुरकर यांनी आपण जिल्हाध्यक्ष असलो तरी इच्छुक आहोत. मात्र, त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमधून ठपका ठेवण्यात आला होता, हा ठपका कोणी ठेवला त्यांचे ते उट्टेदेखील काढू शकतात.शिवसेनेतही असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. कारण शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची रांग आहे. इच्छुक हे कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचे काम करू असे म्हणत आहेत; पण मागील दोन्ही निवडणुकांत एकमेकांना पाडणारे खरोखर मदत करतील की मागील पराभवाचे उट्टे काढतील, हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यात शिवसेनेत जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुख यांना बदलले गेले. त्यामुळे त्यांचा राग ते आपल्या समर्थक यांच्या माध्यमातून काढतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील जुनी भांडणे यांचा राग मतपेटीतूनही बाहेर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत कमी मतदार याबद्दलही वेगळी पावले उमेदवार निश्चित झाल्यानंतर उचलली जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासमोर पक्षांतील नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यात शिवसेनेमधील आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. विद्यमान उपजिल्हाप्रमुख भाई गायकर विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर, माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे, तालुका संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, माजी सरपंच संतोष कोळंबे आणि नेरळ शाखेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे अशी नावे समोर आली आहेत. त्यात उमेदवार म्हणून आघाडीवर महेंद्र थोरवे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर असून शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नाही तर मग काय होणार हा प्रश्न शिवसैनिकांना सतावत आहे. त्यामुळे मागील कटकारस्थाने त्यांमुळे फटका बसलेले कार्यकर्ते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या दोन्ही उमेदवार यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.