शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

By Admin | Updated: September 5, 2015 22:57 IST2015-09-05T22:57:53+5:302015-09-05T22:57:53+5:30

फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर

Help of farmers Rs. 3 crores 65 lakhs | शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखांची मदत

- सिकंदर अनवारे,  दासगांव
फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर ही मोठ्या प्रमाणात गळूण गेला होता. याची भरपाई म्हणून महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान पोटी ३ करोड ६५ लाखाची मदत जाहीर केली असूनही मदतीची रक्कम महाड तहसिल कार्यालयात वर्ग करण्यात आली आहे.
पावसाळ्यात कोकणातील बळीराजा हा निसर्गावर अवलंबून राहून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतो आणि पावसाळा संपता संपता कडधान्याची ठोकणी व पेरणी करुन जवळपास मार्च महिन्यापर्यंत दुबार कडधान्याचेही पिक काढतो.मात्र यंदा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळावधीमध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकाऊन नेला होता. यामुळे पावटा, वाल, तूर, मुंग, हरभरा, मटकी अशी अनेक कडधान्याची पिके या पावसामुळे नासधुस झाली होती. यावेळी तलाठ्यांमार्फत प्रत्येक विभागाचे नुकसानीचा पंचनामे करण्यात आले होते. शासनाने याची दखल घेत महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाखाची मदत जाहीर केली असून शेतकऱ्यांना वाटपासाठी ही रक्कम महाड तहसिल कार्यालयाकडे वर्ग केली आहे.
या नुकसानाचे निकष काढत शासनाने ज्या शेतकऱ्यांचे आंबा व काजू पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर ज्या शेतकऱ्यांचे कडधान्याचे नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी एक हजार अशी मदत देण्यास जाहीर केली आहे. या लागणाऱ्या पावसामध्ये २५०३ अंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर ४९७१ कडधान्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी होते.

फेब्रुवारी व मार्चमध्ये महाड तालुक्यातील ७४७४ शेतकऱ्यांचे आंबापिके व कडधान्याचे नुकसानीचे पंचनामे करुन शासनाकडून पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे ३ कोटी ६५ लाखाची मदत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पंचनाम्याच्यावेळी ७/१२ किंवा पासबूक झेरॉक्स घेण्यात आली नव्हती. लाभार्थी शेतकऱ्यांची नावे प्रत्येक सजेतील तलाठ्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. त्यांनी ७/१२, बँकखाते पासबूक झेरॉक्स जमा केल्यावर लगेच पैसे वर्ग होतील.
- संदीप कदम, तहसीलदार, महाड

Web Title: Help of farmers Rs. 3 crores 65 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.