शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

By राजेश भोस्तेकर | Updated: July 8, 2024 09:28 IST

रामराजमध्ये सर्वाधिक २८० मिमी पडला पाऊस, पूरस्थितीमुळे अलिबाग-रोहा मार्ग वाहतुकीस बंद.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका बसला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसून नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. अलिबाग रोहा रस्ता रस्त्यावर पाणी साचल्याने पावसामुळे वाहतुकीस बंद झाला आहे. तालुक्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन सह अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील हे परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत. सुदैवाने या परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. रामराज मंडळात सर्वाधिक २८० मिमी पाऊस पडला आहे. 

अलिबाग तालुक्यात मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. त्यातच समुद्राला भरती असल्याने वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि भरती यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अलिबाग तालुक्यातील नेहूली, रामराज, चौल, नागाव या भागात नदी, खाडीला पाणी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. रामराज बोरघर हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. अलिबाग रोहा मार्गावर ही पाणी साचल्याने हा मार्गही वाहतुकीस बंद झाला आहे. 

नागाव बायपास हा रस्ता ही पाण्याने भरल्याने बंद आहे. अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील हे तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर जिल्हाधिकारी किशन जावळे हे सुध्दा पावसाळी परिस्थितीबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. पाणी येऊन नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे केले जात आहेत. पावसाचा जोर अजूनही ओसरला नसल्याने सोमवारीही पूरस्थिती वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदी, खाडी किनारी भागतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.  अलिबागमध्ये मंडळ निहाय पडलेला पाऊस

सारळ २२१ मिमी, चरी २३६ मिमी, रामराज २८० मिमी, किहीम २१४ मिमी, पोयनाड १८४ मिमी, चौल १९२ मिमी एवढा पडला आहे.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामानalibaugअलिबाग