शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 2:09 AM

जिल्ह्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीने अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...

जिल्ह्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीने अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. माणगाव-सोन्याच्या वाडीमधील ८६ नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाचविले आहे. त्याचप्रमाणे, काळ नदीमध्ये एक युवक वाहून गेला आहे. संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. अलिबाग तालुक्यातही पावसाने आपले रौद्ररूप दाखविले आहे. बोर्ली-मांडला ते महाळुंगे काकळघर दिशेने जाणाºया मार्गावरील मांडला गावापासून जवळच सोमाई नदीला पूर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. रामराज पुलावरूनही पुराचे पाणी जात असल्याने वावे-रामराज हा मार्गही वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. विविध ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.माणगाव तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमानमाणगाव : माणगाव तालुक्यात बºयाच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन माणगाव शहरातील काळनदी तुडुंब भरून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यातच एक तरुण डोहाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे.माणगावात तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. माणगाव बाजारपेठेत व आसपास सर्वत्र जलमय परिस्थिती दिसत आहे. माणगाव बसस्थानक आवारात पाणीच पाणी झाले आहे.रिळे पाचोळ, निळगुण या गावाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहेत, तसेच शेती पाण्याखाली गेल्याचे दृश्य दिसत आहेत.आशुतोष कुचेकर (वय १९, रा. नागोठण)े हा युवक माणगाव तालुक्यातील निळज येथील डोहात बुडाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे माणगाव तहसील कार्यालयाकडून माहिती मिळाली.दिघी माणगाव रस्त्यावर माणगावनजीक असणाºया पुलावरून पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, तसेच मोर्बा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. ही दरड हटविण्याचे काम प्रशासनाने केले.चौल-रेवदंडालाझोडपलेलोकमत न्यूज नेटवर्करेवदंडा : सलग दुसºया दिवशी चौल-रेवदंडा परिसराला पावसाने झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी साचले. बळीराजाने शेतात पाणी असल्याने भातलावणीची कामे आज बंद ठेवलेली दिसत होती. मात्र, पाऊस स्थिरावल्याने बळीराजा सुखावला आहे.या वर्षी चक्रीवादळानंतर काही दिवसांनी पावसाला सुरुवात झाली, तरीही पाऊस जुलै महिन्यात स्थिरावला नाही. आता मात्र, गेले तीन दिवस पावसाने दमदार हजेरी चालू ठेवल्याने परिसरातील नदी, नाले, विहिरी व तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. बाजारात पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.दरम्यान, या पावसाबरोबर अनेक तास बत्ती गुल असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून, गणेशमूर्ती बनवणाºया कार्यशाळांना खंडित विद्युत पुरवठ्याचा चांगलाच फटका बसला.८६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढलेमाणगाव : माणगाव तालुक्यातील गोरेगावजवळील सोन्याची वाडी येथे पुराच्या पाण्यात बुधवारी १०० ग्रामस्थ अडकले. त्यापैकी ८६ जणांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले.पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच, माणगावचे नायब तहसीलदार भाबड , मंडळ अधिकारी पाटील, तलाठी पवार, सरपंच श्रुती कालेकर, पोलीस निरीक्षक ए जी. टोम्पे यांच्यासह सर्व महसूल आणि पोलीस कर्मचारी यांनी महाड येथील प्रशांत साळुंखे यांच्या राफटर पथकाला तत्काळ पाचारण केले. पथकातील सदस्यांनी बोटीच्या सहायाने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. ८६ ग्रामस्थांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस