जिल्हा न्यायालयात आज होणार आक्षेपावर सुनावणी

By Admin | Updated: November 14, 2016 04:24 IST2016-11-14T04:27:58+5:302016-11-14T04:24:22+5:30

अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांविरोधातील आक्षेपावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Hearing on the objection to the District Court today | जिल्हा न्यायालयात आज होणार आक्षेपावर सुनावणी

जिल्हा न्यायालयात आज होणार आक्षेपावर सुनावणी

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांविरोधातील आक्षेपावर सोमवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये नेमके काय होणार या विवंचनेत आघाडी आणि संघर्ष समिती अडकल्याने निवडणुकीतील रणधुमाळीला अद्याप पाहिजे तशी रंगत आलेली नाही.
शेकाप सत्ताधारी पक्षाविरोधात सर्व पक्षीय एकवटले आहेत. काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत त्यांच्या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे, तर शिवसेनेनेही आपले उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहेत. अलिबागमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहेत. शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक हे ठेकेदार असल्याचा ठपका संघर्ष समितीतील काँग्रेस आणि भाजपाने ठेवला आहे. नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देत त्यांच्याविरोधात अलिबागच्या जिल्हा न्यायालयात आक्षेप घेत दाद मागण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेकापचे उमेदवार अनिल चोपडा यांच्या उमेदवारीलाही याच मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अन्य आठ नगरपालिकेतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. मात्र, अलिबागच्या बाबतीमधील प्रकरण न्यायालयात सुरू असल्याने तेथील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेली नाहीत. न्यायालयातील प्रकरणावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे अलिबाग शहरामध्ये प्रचाराचा धुरळा अद्याप उडताना दिसून येत नाही. शेकापसह काँग्रेस, भाजपा, शिवसेनेने प्रचाराला काही प्रमाणात सुरुवात केली असली, तरी प्रचारात अद्याप रंगत आलेली नाही.
दरम्यान, चिन्ह वाटप झालेले नसतानाही शेकापने कपबशी चिन्हासह उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर ठिकठिकाणी लावल्याचे दिसून आले.

Web Title: Hearing on the objection to the District Court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.