माथेरानमधील अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका
By Admin | Updated: May 12, 2017 01:52 IST2017-05-12T01:52:03+5:302017-05-12T01:52:03+5:30
शासनाने कितीही गाजावाजा करून, दवंडी पिटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना घरोघरी जाऊन जरी दिला तरीसुद्धा नागरिकांची

माथेरानमधील अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : शासनाने कितीही गाजावाजा करून, दवंडी पिटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना घरोघरी जाऊन जरी दिला तरीसुद्धा नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने नेहमीच येथील काही प्रभाग अस्वच्छतेचे माहेरघर बनलेले आहेत. यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना नाकीनऊ येत आहेत.
माथेरान नगरपालिकेच्या वतीने नेहमीच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात अथवा शालेय दिंडी असेल त्याही वेळेस विद्यार्थ्यांमार्फत आपापल्या परिसराची स्वच्छता राखण्याची विनंती आणि सूचना दिली जात असते. एवढेच नव्हे तर नगरपालिकेच्या कचरावेचक महिला दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी येत आहेत. परंतु येथील काही प्रभागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता संपुष्टात आल्यामुळे याचा नाहक त्रास त्या त्या भागातील लॉजिंगमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना, पादचाऱ्यांना आणि रहिवाशांना होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला
आहे.
ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देण्याबद्दल वारंवार नगरपालिका मुख्याधिकारी सागर घोलप हे सूचित करीत असतात. त्याबाबत अनेकदा कशाप्रकारे या कचऱ्याचे संकलन करावे ही प्रात्यक्षिके सुद्धा दाखवलेली आहेत. घोड्यांची लीद असो वा उष्टांन असो हे सर्व नगरपालिकेच्या कचरा गाडीत जमा करून ते कर्मचाऱ्यांमार्फत नगरपालिकेच्या बायोगॅसमध्ये प्रक्रि येसाठी नेले जाते. परंतु याचे नियोजन नागरिक करीत नाहीत. कुणी घोड्यांची लीद, प्लास्टिक पिशव्या, लहान मुलांचे हग्गीज पॅड, फळांच्या साली वा अन्य ओला, सुका कचरा जवळपासच्या गटारात टाकत आहेत. त्यामुळे दर दोन दिवसांनी ही गटारे स्वच्छ करावी लागत आहेत.