रायगडमध्ये ९० टक्के व्यापा-यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:58 IST2017-07-28T00:58:46+5:302017-07-28T00:58:53+5:30
२० लाखांपेक्षा आधिक वार्षिक उलाढाल असणाºया व्यापाºयांनी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करीत करदाता हा प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला.

रायगडमध्ये ९० टक्के व्यापा-यांची नोंद
नांदगाव/ मुरु ड : २० लाखांपेक्षा आधिक वार्षिक उलाढाल असणाºया व्यापाºयांनी नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करीत करदाता हा प्रामाणिक असल्याचा निर्वाळा दिला. रायगड जिल्ह्यात ९० टक्के व्यापारी वर्गाने जीएसटीमध्ये नोंदणी केली आहे. सर्व अप्रत्यक्ष कर आता या एकाच करात अंतर्भाव करण्यात आले आहेत. कर रचनेतील सुटसुटीतपणामुळे ग्राहकांना वस्तू व सेवांच्या किमतीची तुलना व छाननी करणे आता सोपे होईल. जीएसटी कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंध सुधारतील आणि संगणकीय कारभारामुळे राज्यांची करवसुलीची कामगिरी आता स्पष्टपणे दिसेल, असा विश्वास केला. कर चुकवेगिरीचा प्रकार उघडकीस आल्यास अँटी प्रॉफिटॅबिलिटी क्लॉझ अंतर्गत दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद असल्याचे उपायुक्त महेश कुळकर्णी यांनी सांगितले.
जीसएसटी कराचे जे दूरगामी परिणाम होतील, ते भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उत्तमच असणे अपेक्षित असून, व्यापारी वर्गात समज-अपसमज तसेच शंकांचे निराकरण व्हावे आणि जनजागृती व्हावी या हेतूने महाराष्ट्र शासन विक्र ीकर विभाग व
मुरुड मर्चंट व्यापारी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कर प्रणालीवर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच मुरुड नगरपरिषद सभागृहात करण्यात आले.
या वेळी राज्यकर सहआयुक्त शिवाजीराव केनवडेकर, उपायुक्त महेश कुळकर्णी, उपायुक्त संजय सावंत, सनदी लेखापाल धनेश शहा, मेहेतर, मर्चंट असोसिएशन अध्यक्ष नितीन अंबुर्ले, उपाध्यक्ष ललित जैन, सचिव सुरेश जैन, नगरसेवक विजय पाटील, मर्चंट पतसंस्था अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.