शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतात कडधान्य, तृणधान्य पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 06:02 IST

उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्यातील उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे, पीक उत्पादनात वाढ व्हावी, तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग व राज्य पातळी या स्तरांवर आयोजित केली आहे. स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना रोख बक्षीसही दिले जाणार आहे.

या पिकांचा समावेशभात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ही पिके खरिपात, तर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांसाठी रब्बीत पीक स्पर्धा होईल.

पीक स्पर्धेत भाग कसा घ्याल? स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान १०  गुंठे लागवड क्षेत्र असावे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचा सात बारा, आठ अ, आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला देणे आवश्यक आहे. पीकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.

स्पर्धेसाठी निकष तालुका कृषी अधिकारी या स्पर्धांचे आयोजन करतील. त्यासाठी शेतकऱ्याला किमान दहा आर. क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल.  तालुकास्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० पेक्षा कमी व आदिवासी गटात पाचपेक्षा कमी अर्ज आल्यास स्पर्धा रद्द केली जाणार आहे.

राज्य शासनाकडून उत्पादकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही याचा लाभ होत असतो. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असते. शेतकऱ्यांना आपली उत्पादकता वाढविणे लाभदायक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करीत आहे.    - उज्ज्वला बाणखेले,     जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर स्पर्धातृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा ही तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर घेतली जाणार आहे. 

५० हजारांपर्यंत बक्षीस गावपातळीवर पहिले बक्षीस पाच हजारांचे असेल तर राज्यपातळीवर पहिले बक्षीस ५० हजारांचे असणार आहे. 

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी