शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

रायगडमध्ये हुतात्म्यांना अभिवादन; सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:32 IST

कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली.

नेरळ : कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढताना २ जानेवारी १९४३ रोजी सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या ७७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी १ आणि २ जानेवारी रोजी मानिवली येथे हुतात्मांना अभिवादन करण्यात आले.हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा ७७ वा स्मृतिदिन गुरुवार, २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती व केंद्र दहिवली- मालेगाव यांच्या विद्यमाने मानिवली येथील स्मारकाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वीर हुतात्मा वीरभाई कोतवाल, हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच १ जानेवारी रोजी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पुण्यभूमीतून ज्योत पेटवून ही मशाल संपूर्ण मानिवली गावात फिरून गावातील तरुण मशाल घेऊन सिद्धगडावर जातात. २ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. तसेच मानिवली येथील हुतात्मा स्मारकात खांडस बिट विभागातील शाळांनी जागर क्रांतीच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी पाटोदा तालुक्यातील सरपंच भास्करराव पेरेपाटील यांना हुतात्मा हिराजी पाटील गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे आदी उपस्थित होते.हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादनम्हसळा : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी म्हसळा नाभिक समाजाचे शहराध्यक्ष महेश खराडे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली. तालुक्याचे माजी अध्यक्ष विलास यादव, दिलीप जाधव, दत्तात्रेय जाधव, नथुराम पवार, राजेंद्र बडे, सुशील यादव, मंगेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाभिक समाजाचे माजी तालुका अध्यक्ष विलास यादव गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो प्रतिमेस अभिवादन केले.माथेरानमध्ये आदरांजलीमाथेरान : माथेरानचे भूमिपुत्र वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली होती, त्यांच्या या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त २ जानेवारी रोजी येथील नौरोजी उद्यानात आदरांजली वाहण्यात आली.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी १०५ वीरांनी आपले बलिदान दिले होते, त्यातील एक म्हणजे माथेरानचे वीर सुपुत्र हुतात्मा अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल त्यांच्या कार्याची अन् देशसेवेची महती युवा पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी २ जानेवारी या दिवशी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हौतात्म्य पत्करलेल्या माथेरानच्या हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे ५.३० वाजता गावातून मशाल फेरी काढण्यात आली, त्यानंतर ६.०२ वाजता नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यज्योत प्रज्वलित केली.