महामानवाला जिल्ह्यात अभिवादन

By Admin | Updated: April 15, 2017 03:28 IST2017-04-15T03:28:21+5:302017-04-15T03:28:21+5:30

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त त्यांना रायगड जिल्ह्यात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सोहळ््याचे

Greetings in the district of Mahamanawala | महामानवाला जिल्ह्यात अभिवादन

महामानवाला जिल्ह्यात अभिवादन

अलिबाग : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त त्यांना रायगड जिल्ह्यात सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते, तर जिल्ह्यात एकूण ७० ठिकाणी अभिवादन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने नीती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हात सर्वत्र डिजिटलधन मेळावा व विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील १५ तालुक्यांत व अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या उपक्र मांनी हा ज्ञानदिन साजरा करण्यात आला.
पेण महसूल विभागात आमदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थित, पेण उपविभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुलदवाड, पेण तहसीलदार अजय पाटणे, पाली उपविभागीय अधिकारी नितील सदगीर, सुधागड पाली तहसीलदार व्ही. एन. निंबाळकर यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कामार्ली येथे आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते डिजिटलधन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटलधन मेळाव्याच्या अनुषंगाने स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भावेश श्यामकांत घरत (प्रथम), बबुलेश राम यादव(द्वितीय) व रूपम सुभाष पाटील (तृतीय) यांना आमदार पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे प्रदान करण्यात आले.
स्टेट बँक आॅफ इंडिया पेण शाखा, जिते येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडखळ येथे युनियन बँक,बेणसे येथे बँक आॅफ इंडिया व समाज मंदिर कामर्ली येथे डिजिधन मेळाव्यात बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे, मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करणे, डिजिटल व्यवहार आदी बाबत नोंदणी व जनजागृती कार्यक्रम करण्यात आले. यावेळी पेण तहसीलदार अजय पाटणे , जयप्रकाश ठाकूर, कामार्ली सरपंच आर. के. दळवी आदींसह ग्रामस्थ, उपस्थित होते. सुधागड तालुक्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून परळी, पेडली, पाली, नांदगाव या ठिकाणी डिजिधन मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उरण तालुक्यात डिजिधन मेळावा, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
अलिबाग महसूल विभागात उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनावणे, अलिबाग तहसीलदार प्रकाश सकपाळ, मुरुड उपविभागीय अधिकारी अमरसिंग भोसले, मुरुड तहसीलदार योगीता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी दिघी ग्रामपंचायत अलिबाग येथे डिजिधन मेळाव्याचे आयोजन करून विविध उपक्रम राबविण्यात आले.
मुरुड तहसील कार्यालयात डिजिधन मेळावा पार पडला.

महामानवाला अभिवादनासाठी तुफान गर्दी
अलिबाग : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणुका, सभा, चर्चासत्रे, शिबिरे असे विविध कार्यक्र म आयोजित करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
महाडमध्ये चवदार तळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चवदार तळे परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर लाखो अनुयायी नतमस्तक झाले.
अलिबाग शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याठी अलिबागच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली ठोसर, पर्यटन समिती सभापती सुरक्षा शहा, चित्रलेखा पाटील, संजना कीर, राकेश चौलकर, महेश शिंदे उपस्थित होते.

चवदार तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चवदार तळे व क्र ांतिभूमीवरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी झाली होती.
नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी नगरपरिषदेतर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाड शहरात सायंकाळी डॉ. आंबेडकराच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
या वेळी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या वेळी नगरपरिषद सभागृहात अभिवादन सभा संपन्न झाली. पंचायत समितीतर्फे सभापती सीताराम कदम यांनीही आंबेडकरांना अभिवादन केले.
रिपाइंतर्फे तालुकाध्यक्ष मोहन खांबे, मुकुंद पाटणे, मधुकर गायकवाड, सुंदरराव जाधव, तुळशीराम जाधव, बिपीन साळवे, विनायक हाटे आदींनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
यानिमित्त ठिकठिकाणांहून आणलेल्या भीमज्योतींचे चवदार तळे येथे स्वागत करण्यात आले. भीमनगर व पंचशीलानगरसह तालुक्यातही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आलेले होते. डॉ. आंबेडकर महाविद्यालयात यानिमित्ताने विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले.

बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली
बोर्ली मांडला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिद्दीने उभे राहून आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन मुरु ड तालुक्यातील बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात सुजित ढगळे यांनी केले.
माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही, तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे, असे म्हणता येणार नाही. माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे. तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्यांइतके कंगाल कोणीच नसेल.
ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा, जर तुमच्याकडे दोन रु पये असतील, तर एक रु पयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जागायचे हे शिकवेल, असे विचार बाबासाहेबांनी मांडले होते, असे बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ढगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी आरोग्य पर्यवेक्षिका हेमलता वाडेकर, रिपब्लिकन पार्टीच्या विभागीय अध्यक्षा नीता जाधव, सावित्री शिंदे यांनी आपले मनोगत मांडले. या वेळी १०८ रु ग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी साजिद हुसैन, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे व्यास पराड, आरोग्यसेविका वृषाली नांदगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जत ते माणगाव बाईक रॅली
नेरळ : कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी बुद्धपूजा उपासक शुद्धोधन साळवी, रमेश गायकवाड यांनी केली. तसेच कर्जत ते माणगाव अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. तसेच शांतिदूत मंडळ डिकसळ यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष मदन हिरे, सचिव समीर गायकवाड, रमाबाई महिला मंडळ, शोभा चव्हाण, संगीता गायकवाड, किशोर गायकवाड, समीक्षा गायकवाड, पुष्पलता गायकवाड आदी उपस्थित होते.

नाईक महाविद्यालयात कार्यक्रम
आगरदांडा : मुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधीसत्त्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी डॉ. उपप्राचार्य -विश्वास चव्हाण, डॉ. मधुकर गायकवाड, डॉ. नारायण गीते, डॉ. श्रीशैल भैरगुंडे, डॉ. सुभाष म्हात्रे आदी उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी समाजाला दिशा दाखवण्यासाठी झटणाऱ्या मंडळींना
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर विचारांचा वारसा दिला असल्याचे प्रतिपादन के ले.

महाड तहसीलमध्ये डिजिधन मेळावा
दासगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे निमित्त साधून महाड तहसीलदारांनी तालुक्यातील विविध शाळा ठिकाणी तसेच तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी नागरिकांना पंतप्रधान डिजिटल धन मेळावाअंतर्गत डिजिटल व्यवहार करण्याबाबत, तसेच नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याकामी कार्यक्रम हाती घेतले.
डिजिटल इंडियाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एच. के. देशमुख ज्युनि. कॉलेज लोअर तुडील येथे निबंध स्पर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे परिसंवाद तालुक्यातील आचलोली येथे रांगोळी स्पर्धा आणि महाड तहसील कार्यालय येथे सभा असे कार्यक्रम या अनुषंगाने आयोजित केले होते. या वेळी तहसीलदार औदुंबर पाटील आदी उपस्थित होते.

कर्जतमध्ये भीमसैनिकांची गर्दी
कर्जत : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६वी जयंती कर्जत तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्जतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासूनच तालुक्यातील भीमसैनिक येत होते. कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

Web Title: Greetings in the district of Mahamanawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.