महाडनजीक विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:40 IST2017-08-15T02:39:58+5:302017-08-15T02:40:01+5:30

महाडनजीक महामार्गावरील गांधारपाले गावचे हद्दीत तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन सहा प्रवासी जखमी झाले.

Great odd accident | महाडनजीक विचित्र अपघात

महाडनजीक विचित्र अपघात

महाड : महाडनजीक महामार्गावरील गांधारपाले गावचे हद्दीत तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन सहा प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.
कार चालक एम.एच. ०४/ ३८२९ ही गाडी घेऊन मुंबईकडे जात असताना गांधारपाले गावाजवळ समोरून येणाºया कार नं. एम.एच. ०५ सी.एच. ४४७८ ला धडक दिली. त्यानंतर याच कारने मुंबईकडून येणाºया एम.एच. ०४ जी.जे. ७५८० कारला धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातामध्ये तिन्ही कारमधील मिळून एकूण सहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये गुंजन गीत, राजेश गीत ( दोघे रा. कल्याण), अरुणा राव, विशाल कुदर, आशा सिंग, जहान खान या प्रवाशांचा समावेश असून या जखमी प्रवाशांवर खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस, वाहतूक पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रु ग्णालयात पाठवून क्रे नच्या सहाय्याने तिन्ही वाहने अपघात स्थळावरून बाहेर काढली. वाहतुकीसाठी महामार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली नाही.

Web Title: Great odd accident