शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतूकीमुळे धोकादायक बनलेल्या धुतूम अंडर पासच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची ग्रामपंचायतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:40 IST

धुतूम ग्रामपंचायतीने चिंता व्यक्त करुन दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

मधुकर ठाकूर,उरण :पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोडच्या अंडर पास रस्त्यावरुन दिवसरात्र धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता रहदारीसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याने धुतूम ग्रामपंचायतीने चिंता व्यक्त करुन दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान नागरिकांच्या दळणवळणाची व्यवस्था म्हणून चार वर्षांपूर्वी अंडरपास आणि सर्व्हिस रोड तयार केला आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोड आणि अंडरपास रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे  दुचाकी, चारचाकी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याशिवाय या अंडरपास आणि सर्व्हिस रोडवरुनदिवस रात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.अंडरपास अपघातांनाही निमंत्रण देणारा ठरत असल्याने अपघाताची संख्या वाढतच चालली आहे.

या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे अंडरपास आणि सर्व्हिस रोड धुतुम रहिवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.याबाबत उपाययोजना करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंडरपास रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी केली असल्याची माहिती धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिली.

मात्र अपघाताचे प्रवण क्षेत्र ( ब्लॅक स्पॉट) नसल्याने हाईटगेट बसविणे तुर्तास तरी शक्य नाही.मात्र याबाबत निश्चितपणे उपाययोजना केली जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणAccidentअपघात