चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक
By Admin | Updated: February 23, 2016 02:18 IST2016-02-23T02:18:12+5:302016-02-23T02:18:12+5:30
चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची

चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक
पनवेल : चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची तमा नसते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्यामिशनचे प्रल्हाद पै यांनी केले.
पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात रविवारी लोकमत व पनवेल नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जीवन विद्या मिशन परिवाराच्या गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन विद्या मिशनच्या कार्याबद्दल पै यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर, बांधकाम सभापती राजू सोनी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष प्रदीप सुभेदार, सचिव आनंद राणे, कोषाध्यक्ष उमेश पांगम, प्रभाकर उंडे, तुषार राणे, सुनील मोरे, निरंजन खवळे, संतोष सावंत, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. कार्यक्र माची सुरु वात जीवन विद्या मिशनच्या कार्याची माहिती देणाऱ्या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली. यानंतर लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमात पै यांनी आठवणींना उजाळा दिला. २००६ मध्ये नाशिक येथे लोकमत व जीवन विद्या मिशन यांचे एकमत झाले तर क्र ांती होईल, असे उद्गार सद्गुरू वामनराव पै यांनी काढले होते. लोकमतने जीवन विद्या मिशन परिवाराला पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे लोकमतने जीवन विद्या मिशनच्या ६० वर्षांच्या कार्याची दखल घेतल्याची पावती आहे. लोकमत हे वाचनीय वृत्तपत्र असून, राज्यभरात लोकमत चांगले काम करीत असून, वाचकांची संख्या २० लाखांच्या वर असल्याचे सांगत लोकमतच्या सखी मंच, दीपोत्सव, कालदर्शिका आदी उपक्रमांचीदेखील पै यांनी भरभरून स्तुती केली. (प्रतिनिधी)
शिस्तबद्ध कार्यक्र मात हजारोंची उपस्थिती
कार्यक्रमाला पनवेलकरांबरोबरच ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईमधील हजारो सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेला या कार्यक्रमात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवन विद्या मिशनच्या घोषवाक्याची प्रचिती आली. पै यांनी लोकमतच्या ‘काहीतरी कर पनवेलकर’ या उपक्रमाचेही कौतुक केले.
माध्यम समाजातील महत्त्वाचा घटक
समाजात चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या दाखविण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. मागील काळात बुवाबाजीवर खूप टीका झाली. मात्र सर्वच आध्यात्मिक संघटनांना यामध्ये गृहीत धरता येणार नाही. सध्या वैचारिक प्रदूषणही वाढत आहे, त्यावर चांगल्या विचारांनी मात होऊ शकते. माध्यमांनी याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पै यांनी दिला.