सुवर्णचषक करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण, महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली उत्तम कामगिरी
By राजेश भोस्तेकर | Updated: October 21, 2022 18:51 IST2022-10-21T18:48:41+5:302022-10-21T18:51:41+5:30
Raigad News: ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ नुकतीच गुजरात येथे पार पडली असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले आहे.

सुवर्णचषक करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण, महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली उत्तम कामगिरी
- राजेश भोस्तेकर
अलिबाग : ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ नुकतीच गुजरात येथे पार पडली असून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उपविजेतेपद पटकावले आहे. याच निमित्ताने महाराष्ट्राचं हे यशस्वी सुवर्णचषक घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व खेळाडू शनिवारी २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११:३०वा. रायगड किल्ल्यावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान असणाऱ्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून मानवंदना देणार आहेत. अशी माहिती रेश्मा ज्ञाते यांनी दिली आहे.
गुजरात येथे नुकतीच ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ पार पडली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रावीण्य दाखवून ३९ सुवर्ण, ३८ रौप्य व ६२ कांस्य अशी एकूण सर्वाधिक १४० पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र संघाने केलेल्या या कामगिरीमुळे उपविजेता पदाचे सुवर्ण चषक मिळाले आहे. संघाने मिळविलेले हे सुवर्ण चषक शनिवारी किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराज याच्या चरणी अर्पण करून मानवंदना देणार आहेत.