गोरेगावच्या मायलेकींची चमकदार कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:53 IST2018-02-01T06:52:51+5:302018-02-01T06:53:01+5:30
दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणाºया मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ज्योतिका पाटेकर यांनी मास्टर वनमध्ये सुवर्णपदक तर मुलगी वैभवी पाटेकर हिने ज्युनिअर सिल्वर पदक मिळवले असून, या मायलेकींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

गोरेगावच्या मायलेकींची चमकदार कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके
माणगाव - दाबेलीची गाडी चालवून आपला संसार चालवणा-या मायलेकींनी मागच्या वर्षी राज्यस्तरावर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली असून, या वर्षीसुध्दा मागील महिन्यात मायलेकींनी राज्यस्तरावर सुवर्ण पदके मिळविली, तर आता नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ज्योतिका पाटेकर यांनी मास्टर वनमध्ये सुवर्णपदक तर मुलगी वैभवी पाटेकर हिने ज्युनिअर सिल्वर पदक मिळवले असून, या मायलेकींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग असोसिएशन नागपूर येथे नुकत्याच १८ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावर ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात २१२.५ किलो वजन उचलून प्रथम येण्याचा मान मिळवला, तर त्यांची कन्या वैभवी हिने ५७ किलो वजनी गटात २३५ किलो वजन उचलून द्वितीय क्र मांक प्राप्त केला. या मायलेकींच्या यशाचे जिल्ह््यातून कौतुक होत आहे.
स्पर्धेकरिता आर्थिक मदतीची गरज
ज्योतिका या दिवसभर दाबेली स्टॉल चालवून रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत सरावासाठी त्या नेहमी वेळ काढतात. पाटेकर यांनी
यापूर्वी सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर, सात वेळा जिल्हा स्तरावर,
पाच वेळा राज्य स्तरावर आणि एकवेळ राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवले आहे. तसेच पाटेकर कुटुंबायांची हलाखीची परिस्थिती
पाहता त्यांना येणाºया स्पर्धांकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
या वेळी गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी व गोरेगावचे श्रीनिवास बेंडखळे यांची या राष्ट्रीय स्पर्धेकरिता आर्थिक मदत लाभली असल्याचे ज्योतिका यांनी सांगितले.