शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ द्या, भाजप किसान मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:18 IST

Farmer News :  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

नेरळ :  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.कर्जत तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करून त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबत मागे भारतात जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन देण्यासाठी भेटले. कर्जत तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले.तहसील कार्यालयानंतर भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेले. त्यावेळी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम पीकविमासंबंधी असून, भविष्यात नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रधानमंत्री पीकविमा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मिळत नसेल तर याला जबाबदार महाराष्ट्र शासन, कृषी अधिकारी आणि विमा कंपनी आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.    यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करून लाभापासून वंचित ठेवून फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. भाजप किसान मोर्चा न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देत आहे. यावेळी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड