रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी
By Admin | Updated: May 26, 2016 03:12 IST2016-05-26T03:12:28+5:302016-05-26T03:12:28+5:30
रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली

रायगड जिल्ह्यात मुलींची बाजी
अलिबाग : रायगड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.१९ टक्के लागला. ३० हजार ८८ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. ८९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ७९.३१ मुले पास झाली. मुंबई विभागात रायगड पाचव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रायगड जिल्ह्याचा निकाल सहा टक्क्यांनी घसरला आहे. जिल्ह्यातील १३ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.
सर्वाधिक ८८.९२ टक्के विज्ञान शाखेचा निकाल लागला. त्याखालोखाल वाणिज्य ८८ टक्के, किमान कौशल्य ८१.९२ आणि कला शाखेतील ७४.२५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली. पुण्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या विविध संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही काहींनी निकाल जाणून घेतला. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्रांसोबत एकच जल्लोष केला.
८४.२२ टक्के निकाल
महाड : महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८४.२२ टक्के लागला आहे. मार्च १६ मध्ये झालेल्या या परीक्षेला महाविद्यालयातील ९३४ विद्यार्थ्यांपैकी ७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी अभिनंदन केले आहे.
राठी इंग्लिश मिडियमचा शंभर टक्के निकाल
रोहा : जे. एम. राठी इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आकांक्षा वाघमारे ही ९०.४६ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे तर समृद्धी झगडे ही ८९.५४ टक्के गुण मिळवून दुसरी, नीलायथ प्रभाकरनने ८५.८५ टक्के गुण मिळवून तिसरी आली.
पोलादपूरचा निकाल ७९.२३ टक्के
पोलादपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांच्यामार्फत फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्य. शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल बुधवार आॅनलाइन जाहीर झाला.या परीक्षेत पोलादपूर केंद्राचा निकाल ७८.२३ टक्के लागला
पोलादपूर केंद्रामध्ये चार शाळांचा समावेश आहे. यात विद्यामंदिर पोलादपूर शाळेचा निकाल ८४.६५ टक्के लागला. कापडे हायस्कूलचा ७५.३६ टक्के निकाल लागला आहे. सुंदररराव मोरे कॉलेज चोळईचा ५५.१० टक्के इतका निकाल लागला आहे.
वैष्णव ज्युनियर कॉलेज पोलादपूरचा ६२.५० टक्के इतका निकाल जाहीर झाला आहे. आॅनलाइन निकाल जाहीर झाल्याने व विद्यामंदिरची विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम ३ क्रमांकाने कोणते विद्यार्थी उत्तीर्ण झाले याची माहिती उशिरापर्यंत मिळाली नाही.
वाणिज्य शाखेमधून किशोरी नाक्ती मुरूडमध्ये प्रथम
मुरु ड /नांदगाव : सर एस. ए. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी किशोरी हरिश्चंद्र नाक्ती हिने वाणिज्य शाखेमधून ८०.९२ टक्के मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर कला शाखेमधून तेजस मनीष प्रधान ७८.६१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सर एस.ए. हायस्कूलचा वाणिज्य व कला शाखेचा निकाल ९१.१० टक्के लागला आहे. अंजुमन हायस्कूल मुरु ड येथे विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. इद्रूस आयेशा मुबीन हिने ६७.६९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. फरहाना शकील कोतविलकरने ६७.५४ टक्के गुण मिळाले.
फरहानाने द्वितीय क्र मांक पटकावला. बांगी मिनर्झा हसन ६७.३८ गुण मिळवून अव्वल ठरली. विज्ञान शाखेतून ११९ विद्यार्थ्यांपैकी १०७ विद्यार्थी पास झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक जाहिद गोठेकर व उदय गद्रे आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
तालुकानिहाय निकाल
तालुकाटक्केवारी
पनवेल८९.५५
म्हसळा८८.२०
उरण८७.५२
मुरुड८७.१९
पेण८६.४७
महाड८६.२९
तळा ८६.२७
अलिबाग ८५.४६
माणगाव८३.९९
कर्जत८३.२१
पोलादपूर८०.६१
रोहे७९.६९
सुधागड७७.५२
श्रीवर्धन७६.२९
खालापूर६४.४४