पराभवाचा वचपा काढा - तटक रे
By Admin | Updated: January 26, 2017 03:22 IST2017-01-26T03:22:39+5:302017-01-26T03:22:39+5:30
रामनाथ मोते यांनी एवढे चांगले काम करूनही भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष लढत आहेत. शिवसेना सत्तेत

पराभवाचा वचपा काढा - तटक रे
आगरदांडा : रामनाथ मोते यांनी एवढे चांगले काम करूनही भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष लढत आहेत. शिवसेना सत्तेत भागीदार असूनही ते दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. सेनेचे म्हात्रे हे उमेदवार आहेत. या फुटीचा फायदा घेत मुरु ड नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यशवंतनगर पंचक्र ोशीतील आगरी समाज सभागृहात बोलताना केले.
कोकण शिक्षक मतदार संघातील पुरोगामी विकास आघाडीचे उमेदवार शेकापच्या बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. मोदी सरकारने तर सर्व शिक्षा अभियानच बंद करून टाकल्याची खंत व्यक्त के ली. यावेळी वसंतराव ओसवाल, मंगेश दांडेकर, सुभाष महाडिक आदी उपस्थित होते.