‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:49 AM2021-05-08T00:49:23+5:302021-05-08T00:49:34+5:30

नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Get free medical advice from a doctor at home through e-Sanjeevani OPD | ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरीच राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये जर काेणालाही घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घ्यायचा असेल तर…काय करायचे ? असा प्रश्न पडताे. मात्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याचा विचार करुन ‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून एक उत्तम पर्याय दिला आहे.

राज्यात गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये सरकारीप्रणित ‘ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी’ सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या माध्यमातून कोणताही गरजू नागरिक घरीच राहून आपल्या आरोग्याविषयी ‘संजीवनी ओपीडी’ या ॲपद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकतो, तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला मिळवू शकतो. दरम्यायान, उपयुक्त अशा उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घरबसल्या घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे. या सेवेमुळे रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. 

ई संजीवनी ओ.पी.डी. करिता असे करा रजिस्ट्रेशन
nई संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात.
nतसेच ॲन्ड्रॉईड मोबाइलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे ॲप (App) डाऊनलोड करता येईल.
nआपला मोबाईल नंबर OTP (One Time Password) द्वारे सत्यापित (Verify) करा.
nमोबाइल नंबर सत्यापित (Verify) झाल्यानंतर टोकन जनरेट करा.
nटोकन (TOKEN) जनरेट झाल्यावर लॉग इन करा.
nलॉग इन झाल्यावर तुमची माहिती भरुन तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करून 
डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.
nई-प्रिस्क्रिप्शन डाऊनलोड करा.

कशी कराल नोंदणी?
nसोमवार ते रविवार सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ते सायं. ५.०० या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल.
nयामध्ये ‘एसएमएस’ द्वारे ई-प्रिस्क्रिप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रिप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
nया योजनेचा वापर करताना लॉग इन करताना काेणाला काहीही अडचण येत असेल तर जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग येथे csraigad70@gmail.com या ई मेलवर कळवावे.

Web Title: Get free medical advice from a doctor at home through e-Sanjeevani OPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड