शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन 

By राजेश भोस्तेकर | Updated: July 18, 2024 14:45 IST

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क 

अलिबाग : रायगडसाठी एक आनंदाची बातमी असून पेणच्या गणपतीं मुर्तीं भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे पेणसह जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती भवनात आयोजित कार्यक्रमात भौगोलिक मानांकन पेणच्या गणपती व्यवसायिकांना बहाल केले आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींना आता स्वतची ओळख निर्माण झाली आहे. 

पेण हे गणरायाचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. पेणच्या गणपतींना देशासह जगभरातून मोठी मागणी असते. अनेक कुटुंब गणेश मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात पिढ्यानपिढ्या काम करीत आहेत. वर्षभर गणपती कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. या व्यवसायातून पेण तालुक्यात करोडो ची उलाढाल दरवर्षी होत असते. 

पेणचे गणपती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेश मूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे पेणच्या गणराय व्यवसायिक यांना फटका बसत होता. यासाठी गणपती व्यवसायिक यांनी दीड वर्षापूर्वी पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने पेणच्या गणपतीला भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात एका कार्यक्रमात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना आता स्वतः ची ओळख निर्माण झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड