शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१९५२ पासून मतदान करणाऱ्या गंगूबाई चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 00:55 IST

मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोग सातत्याने आवाहन करून, नवमतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करत आहे.

- दीपक साळुंखे मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोग सातत्याने आवाहन करून, नवमतदारांना मतदानाकरिता प्रोत्साहित करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वप्रथम १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा हक्क न चुकता बजावून खºया अर्थाने लोकशाही अबाधित राखण्याच्या प्रक्रियेत अनन्य साधारण कामगिरी बजावलेल्या महाड तालुक्यातील आमशेत या छोट्या गावातील तब्बल ११० वर्षांच्या वयोवृद्ध गंगूबाई विठ्ठल चव्हाण या यंदाच्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत २३ एप्रिललाही मतदान करणार आहेत.१९५२ पासून तुम्ही मतदान करताय, त्याच्या काही आठवणी सांगा?१ जानेवारी १९०८ रोजी माझा जन्म झाला, १९५२ मध्ये तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघात झालेल्या सी. डी. देशमुख (काँग्रेस) विरुद्ध राजाराम राऊत (शेकाप) अशा पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे आठवते; परंतु त्या वेळच्या आठवणी मात्र सांगता येणार नाहीत. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत महाडचे काँग्रेस नेते शंकरराव बाबजी सावंत तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांच्या लोकसभा निवडणुकीत मतदान के ले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाडचे आमदार नानासाहेब पुरोहित आणि आमदार शांतारामभाऊ फिलसे यांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याचे मला आठवते. गतवर्षी आॅक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या महाड तालुक्यातील आमशेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही मी मतदान केले.एवढे वय झाल्यानंतरही न चुकता मतदान करता?लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांमध्ये आपण न चुकता मतदान केले. गेल्या आठ-दहा वर्षांपासून वृद्धापकाळामुळे चालण्याचा त्रास होत असल्याने त्या मतदानाच्या दिवशी कुटुंबीयांकडे मतदानासाठी घेऊन जाण्याचा आग्रह धरते.माझ्या कुटुंबातील सदस्य मुलगा सुधाकर विठोबा चव्हाण, सून सुजाता सुधाकर चव्हाण, नातू बाबुराव सुधाकर चव्हाण, नातसून प्रणाली बाबुराव चव्हाण आणि गणेश चव्हाण असे सगळे जण न चुकता मतदानाला जातात. मी त्यांना नेहमीच मतदानासाठी प्रोत्साहित करत असते. आजवर कधीच मतदान करण्याची संधी मी गमावली नाही.नुकताच साजरा केला ११० वा वाढदिवसलोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या निवडणुकांमध्ये गंगूबाई चव्हाण नेहमीच मतदानाचा हक्क बजावत असतात. सरकार सत्ता कोणाचीही गंगूबाई चव्हाण आपल्या मतदानाचा हक्क नेहमीच बजावत असतात. गंगूबाई यांच्या वयाचा ११० वा वाढदिवस गुरुवारीच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. 

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक