गणेशभक्तांनी पाली हाऊसफुल्ल!

By Admin | Updated: July 6, 2015 01:37 IST2015-07-06T01:37:04+5:302015-07-06T01:37:04+5:30

अधिक मासातील संकष्ट चतुर्थी हा योग आल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी पहाटेपासूनच रांग लावली होती

Ganesh worshipers Pali Housefull! | गणेशभक्तांनी पाली हाऊसफुल्ल!

गणेशभक्तांनी पाली हाऊसफुल्ल!

पाली : अधिक मासातील संकष्ट चतुर्थी हा योग आल्याने पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी पहाटेपासूनच रांग लावली होती. सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देवस्थानची मोफत वाहन व्यवस्था पूर्णपणे गाड्यांनी भरल्यामुळे अनेक खाजगी गाड्यांच्या चालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत वाहने पार्किंग केली तर शेकडो मोटारसायकली रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या होत्या.
संकष्ट चतुर्थीला एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी दुकानदारांना सुध्दा आश्चर्यचकित करणारी होती. परंतु अधिक मास सुरू झाल्याने त्यात ही संकष्ट चतुर्थी हा मोठा योग असतो, असे एका गणेश भक्ताने सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Ganesh worshipers Pali Housefull!