शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

पेणचे गणपती बाप्पा गेले फॉरेनला... पाच हजार मूर्तींची पाचवी खेप कॅनडा, अमेरिकेला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:47 IST

मूर्तिकलेच्या माहेरघरातून गणेशमूर्तींची परदेशवारीची या वर्षातील पाचवी खेप गुरुवारी पेणमधून रवाना झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पेण: मूर्तिकलेच्या माहेरघरातून गणेशमूर्तींची परदेशवारीची या वर्षातील पाचवी खेप गुरुवारी पेणमधून रवाना झाली. पाच हजार लहान-मोठ्या मूर्ती या खेपेत कॅनडा व अमेरिकेत पाठवल्याचे दीपक कला केंद्राचे मालक मूर्तिकार सचिन आणि नीलेश समेळ यांनी सांगितले.

परदेशातील अनिवासी भारतीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यासाठी ते मूर्तिकलेचे माहेरघर असलेल्या पेण शहरातूनच गणेशमूर्ती मागवतात. एकदा का पाऊस सुरू झाला की वादळवारे व समुद्र खवळलेल्या स्थितीत मूर्ती पाठवता येत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच ही ऑर्डर पूर्ण करावी लागते. दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत ही मागणी नोंदविली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांनी ही ऑर्डर पोहोचवण्यासाठी कार्यशाळेत नियोजनपूर्वक काम सुरू केले जाते. यावर्षी वस्त्र प्रावरणांनी सजलेल्या गणेशमूर्तींना परदेशातील गणेशभक्तांकडून मोठी मागणी होती. कुशल कामगारांच्या अभावी ती पूर्ण करताना येथील मूर्तिकारांना मोठी कसरत करावी लागते.

  • आतापर्यंत येथे पाठवल्या मूर्ती

याअगोदर लंडन, सिंगापूर, बँकाक, आस्ट्रेलिया, मलेशिया, थायलंड व अमेरिका या देशात चार ऑर्डर पाठवण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच हजार गणेशमूर्ती बॉक्स पॅकिंगसह पाठवण्यात आल्या. एक ते चार फूट आणि मोठ्या दहा फुटांच्या सहा मूर्तींचा यात समावेश आहे.या वर्षी तब्बल ३० हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. पंधरा दिवसांनी आणखी एक खेप होणार आहे. अमेरिकेत सर्वाधिक मूर्ती गेल्या आहेत. इको-फ्रेंडली पर्यावरणपूरक मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.- नीलेश समेळ, मूर्तिकार, दीपक कला केंद्र, पेण.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवpen-acपेणCanadaकॅनडाAmericaअमेरिका