आठ लाखांचा निधी अपंगांसाठी वितरित

By Admin | Updated: October 15, 2016 06:52 IST2016-10-15T06:52:32+5:302016-10-15T06:52:32+5:30

रोहा नगर परिषदेकडे नोंदणीकृत असलेल्या अपंग व्यक्तींना अपंग कल्याण निधीअंतर्गत सुमारे आठ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी वितरित करण्यात

Fund of Rs. 8 lakhs distributed to disabled persons | आठ लाखांचा निधी अपंगांसाठी वितरित

आठ लाखांचा निधी अपंगांसाठी वितरित

रोहा : रोहा नगर परिषदेकडे नोंदणीकृत असलेल्या अपंग व्यक्तींना अपंग कल्याण निधीअंतर्गत सुमारे आठ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी वितरित करण्यात आला. पालिकेच्या या
उपक्र माचा ७१ अपंगांना लाभ मिळाला असून अनेक वर्षे परत जाणारा हा निधी यंदा वितरित झाल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाच्या तरतुदीनुसार अपंगत्व आलेल्या व्यक्तींना पालिकेकडील तीन टक्के राखीव निधीतून त्यांच्या व्यवसाय निर्मिती, शिक्षण, औषधोपचार, उदरनिर्वाह आदींसह आवश्यक साहित्य खरेदीकरिता
अपंग प्रमाणपत्रानुसार सहाय्यता करणे क्र मप्राप्त असते. यंदा ७१ अपंगांना प्रमाणपत्रानुसार १० ते १५ हजार रु पयांपर्यंत अपंग निधीची सहाय्यता मिळाली आहे. रोहा नगरपालिका कार्यालयात शुक्रवारी एकूण आठ लाख सव्वीस हजार रु पये इतका निधी वितरित करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Fund of Rs. 8 lakhs distributed to disabled persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.