न्यायाधीशांच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न, महाडमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 02:39 IST2018-03-22T02:39:38+5:302018-03-22T02:39:38+5:30

न्यायाधीशांच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न, महाडमधील घटना
महाड : बुधवारी सकाळी पती-पत्नीमधील वादाची सुनावणी सुरू असतानाच पतीने न्यायाधीशांसमोरच स्वत:च्या पोटात धारदार सुरा खुपसत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात जखमी झालेल्या गंगाराम वाडकर याची) प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला नेले.
त्याची पत्नी वैशालीने महाड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी महाड न्यायालयात सुरू आहे. बुधवारी दुपारी सहदिवाणी न्यायाधीश डोईफोडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. वकील आले नसल्याने गंगारामने मला काही बोलायचे आहे असे सांगत सुरा बाहेर काढून स्वत:च्याच पोटात खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या पत्नीने धाडस दाखवत त्याच्या पोटातील सुरा बाहेर काढला. पण त्याने हिसकावून घेत पुन्हा स्वत:वर वार केले. न्यायाधीशांसमोरच हा प्रकार घडला. Þ गंगारामविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाड शहर पोलीसांत दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.