टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा

By Admin | Updated: May 9, 2017 01:29 IST2017-05-09T01:29:43+5:302017-05-09T01:29:43+5:30

पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने टँकरद्वारे नियोजनबध्द पेयजल पुरवठा

Free water supply to scarcity-hit villages | टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा

टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये केवळ सामाजिक बांधिलकीच्या हेतूने टँकरद्वारे नियोजनबध्द पेयजल पुरवठा करण्याचा उपक्रम ‘मी रायगडकर राजे’ संघटनेतर्फे हाती घेण्यात आला आहे. संघटनेकडून सातत्याने तिसऱ्या वर्षीही हा उपक्रम सुरू ठेवला आहे.
पोलादपूर तालुक्यात विविध उपक्र म राबविण्यासोबत पाणीटंचाईचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संघटना येत्या काळात कटिबध्द राहील, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष भगवान पार्टे यांनी केले.
पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून संघटनेतर्फेसोमवारी टँकरद्वारे पेयजल पुरवठा उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन वैभव चांदे, संघटनेचे अध्यक्ष भगवान पार्टे व मार्गदर्शक कृष्णा चंद्रकांत कदम, संजय विठ्ठल उतेकर, राज पार्टे, किशोर मोरे, माजी उपसभापती लक्ष्मणबुवा खेडेकर, लक्ष्मण वाडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, अनिल मालुसरे, विठ्ठल पार्टे, संतोष कदम, शहरप्रमुख सुरेश पवार, अनिल दळवी, गणपत उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभारंभाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील विठ्ठल पार्टे व नारायण पार्टे यांच्या उपस्थितीत बोरघर ५ हजार लिटर्स, चिकणेबुवांच्या उपस्थितीत पोफळ्याचा मुरा गावात ३ हजार लिटर्स, गणपत गोगावले यांच्या उपस्थितीत कामथे माडाची वाडी येथे ३ हजार लिटर्स, रामचंद्र कदम यांच्या उपस्थितीत वडघर भोसाडवाडी ३ हजार लिटर्स पेयजल पुरवठा चार टँकर्सद्वारे करण्यात आला.
पावसाळ्याची दमदार सुरुवात होईपर्यंत पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पेयजल पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष भगवान पार्टे यांनी सांगितले.

Web Title: Free water supply to scarcity-hit villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.